मेहुल चोक्सीविरोधातील रेड कॉर्नर नोटीस इंटरपोलने हटविली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 05:40 AM2023-03-22T05:40:25+5:302023-03-22T05:40:56+5:30
इंटरपोलने ‘रेड कॉर्नर नोटिस’च्या डेटामधून हटवण्याचा निर्णय घेतल्याने चोक्सीने अँटिग्वामध्ये राहताना केलेल्या अपहरणाबद्दलच्या दाव्याला बळकटी मिळाली आहे, असे डायमँटायरच्या प्रवक्त्याने सांगितले.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचे नाव त्याने केलेल्या याचिकेच्या आधारे इंटरपोलच्या ‘रेड कॉर्नर नोटिस’च्या डेटामधून काढून टाकल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणी विरोधी पक्षांनी केंद्रावर हल्लाबोल केला आहे. इंटरपोलने ‘रेड कॉर्नर नोटिस’च्या डेटामधून हटवण्याचा निर्णय घेतल्याने चोक्सीने अँटिग्वामध्ये राहताना केलेल्या अपहरणाबद्दलच्या दाव्याला बळकटी मिळाली आहे, असे डायमँटायरच्या प्रवक्त्याने सांगितले.
प्रत्यार्पण, शरणागती किंवा तत्सम कायदेशीर कारवाईपासून पळ काढणाऱ्या गुन्हेगाराला शोधून अटक करण्यासाठी १९५ सदस्यीय इंटरपोलने जगभरातील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना जारी केलेल्या अलर्टचा रेड नोटिस हा सर्वोच्च प्रकार आहे. चोक्सीविरुद्ध ‘रेड कॉर्नर नोटिस’ बहालीसाठी इंटरपोलशी संपर्क साधल्याची माहिती सीबीआयतर्फे देण्यात आली.