लाल किल्ल्यावरील हिंसाचारातील आरोपी असणाऱ्या दीप सिद्धूच्या अटकेसाठी एक लाखाचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 12:24 PM2021-02-03T12:24:37+5:302021-02-03T12:46:17+5:30

Deep Sidhu News : शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप ज्या दीप सिद्धूवर ठेवण्यात आला असून तो अद्याप फरार आहे.

red fort violence delhi police announced cash rewards of rs 1 lakh each on deep sidhu jugraj singh | लाल किल्ल्यावरील हिंसाचारातील आरोपी असणाऱ्या दीप सिद्धूच्या अटकेसाठी एक लाखाचं बक्षीस

लाल किल्ल्यावरील हिंसाचारातील आरोपी असणाऱ्या दीप सिद्धूच्या अटकेसाठी एक लाखाचं बक्षीस

googlenewsNext

नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली मात्र यावेळी काही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. थेट लाल किल्ल्यात घुसून शेतकऱ्यांनी धर्मध्वज फडकवला, शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप ज्या दीप सिद्धूवर ठेवण्यात आला असून तो अद्याप फरार आहे. दीप सिद्धू याच्यासह इतर सहा जण देखील फरार आहेत. या सर्वांच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी आता बक्षीस जाहीर केलं आहेत. यामध्ये दीप सिद्धूसह चार जणांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाखाचं रोख बक्षीस तर उर्वरित तीन जणांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी 50,000 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.

दीप सिद्धूसह जुगराज सिंग, गुरजोत सिंग आणि गुरजंत सिंग यांच्या अटकेसाठी त्यांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाख रुपयाचं बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या जाजबीर सिंग, बूटा सिंग, सुखदेव सिंग आणि इकबाल सिंघ यांच्या अटकेसाठी प्रत्येकी 50,000 रुपये रोख रक्कमेची घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी दीप सिद्धूचा एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये त्याने भाजपा खासदार सनी देओल याच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर काही हिंसक शेतकऱ्यांनी पोलिसांना मारहाण करत थेट आतमध्ये घुसले, याठिकाणी आंदोलकांनी साहिब निशान फडकवले होते. दीप सिद्धू याच्यावर शेतकरी नेत्यांनी आरोप केले होते.

दीप सिद्धूने व्हिडीओत सनी देओलने लोकांचा विश्वासघात केला आहे. मी माझ्या आयुष्यातील 20 दिवस सनी देओल माझा भाऊ आहे म्हणून प्रचार केला, भाजपासाठी मतदान मागितलं नव्हतं, मी आरएसएस, भाजपाचा माणूस आहे असं सांगितलं जात आहे, सनी देओल सोशल मीडियात पोस्टवर पोस्ट करत आहेत असं सांगितलं होतं. मी पंजाब आणि येथील लोकांचा आवाज उठवला, पण माझ्यावर गद्दारीचा शिक्का मारण्यात आला. मला या गोष्टीची पर्वा नाही की सरकार काय म्हणतं, लोक काय म्हणतात त्यामुळे मी दुखी आहे, बिहारी मजुरांसह शेतात राहिल्याचं दीप सिद्धूने सांगितलं होतं. तर ही माणसं मला साथ देतात म्हणून मी त्यांच्यामध्ये राहत आहे, जर मी सरकारचा माणूस असतो तर लग्झरी हॉटेलमध्ये मजेत राहिलो असतो असं त्याने सांगितलं होतं. 

दीप सिद्धू भाजपाचा माणूस – राकेश टिकैत

भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आरोप लावला आहे की, दीप सिद्धू भाजपाचा माणूस आहे. लाल किल्ल्यावरील घटनेनंतर दीप सिद्धूची गुरदासपूरचे भाजपा खासदार सनी देओल यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला होता, त्यानंतर सनी देओलने ट्विट करून दीप सिद्धूचा माझ्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण दिलं होतं.

Web Title: red fort violence delhi police announced cash rewards of rs 1 lakh each on deep sidhu jugraj singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.