स्नॅपडील 600 कर्मचा-यांची करणार कपात
By admin | Published: February 22, 2017 01:47 PM2017-02-22T13:47:15+5:302017-02-22T13:51:07+5:30
ई- कॉमर्समध्ये लोकप्रिय असलेली स्नॅपडील कंपनी येत्या काही दिवसांत आपल्या कर्मचा-यांमध्ये कपात करणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - ई- कॉमर्समध्ये लोकप्रिय असलेली स्नॅपडील कंपनी येत्या काही दिवसांत आपल्या कर्मचा-यांमध्ये कपात करणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नॅपडीलने गेल्या आठवड्यात कर्मचारी कपात करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कंपनी स्नॅपडीलसोबतच व्हल्कन आणि फ्रीचार्ज विभागातील जवळपास 500 ते 600 कर्मचा-यांची कपात करणार आहे. सध्या कंपनीमध्ये आठ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
दरम्यान, गेल्या दोन वर्षात भारतात पहिल्यांदाच कंपनीला ई-कॉमर्समध्ये फायदा होत आहे. विशेषता, सर्व भागांत आमचा व्यवसाय चालू ठेवणे महत्वाचे आहे. तसेच, आमचा व्यवसाय वाढविण्यास आमचे रिसोर्स आणि टीममध्ये सुधारणा करण्यात येत आहे, असे स्नॅपडील कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितले.