काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा, राजनाथ सिंह यांचा बैठकीनंतर दावा; सर्व संबंधितांशी बोलण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 01:37 AM2017-09-12T01:37:16+5:302017-09-12T01:38:19+5:30
गेल्या वर्षभरात काश्मीर खोºयातील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे व शांततेचे काही हिरवे कोंब दिसत आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथे म्हणाले. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधितांशी बोलण्याची केंद्र सरकारची तयारी आहे, असेही राजनाथ सिंह यांनी या वेळी बोलून दाखविले.
श्रीनगर : गेल्या वर्षभरात काश्मीर खोºयातील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे व शांततेचे काही हिरवे कोंब दिसत आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथे म्हणाले. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधितांशी बोलण्याची केंद्र सरकारची तयारी आहे, असेही राजनाथ सिंह यांनी या वेळी बोलून दाखविले. त्यांच्या या वक्तव्यातून केंद्र सरकारच्या भूमिकेमध्ये बदल झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
जम्मू व काश्मीरच्या चार दिवसांच्या दौ-यावर आलेले राजनाथ सिंह वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की, काश्मीरमधील शांततेचे झाड वाळून गेलेले नाही. काश्मीर प्रश्नावरील कायमचे उत्तर हे कम्पॅशन (करुणा), कम्युनिकेशन (संवाद), को-एक्झिस्टन्स (सहअस्तित्व), कॉन्फिडन्स बिल्डिंग (आत्मविश्वास निर्माण करणे) व कन्सिस्टन्सी (सातत्य) या पाच ‘सी’वर अवलंबून आहे. शिष्टमंडळांनी घेतलेल्या भेटी व घेतलेल्या बैठकांनंतर काश्मीरमध्ये परिस्थितीत मोठी सुधारणा झाल्याचे माझ्या लक्षात आले आहे. परिस्थिती सुधारत आहे, हे मी ठाम विश्वासाने सांगतो, असे ते म्हणाले. पर्यटक व पर्यटन संस्थांनी पुन्हा एकवार काश्मीरमध्ये दौरे सुरू करावेत, त्यांचे इथे स्वागतच होईल, असेही केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. (वृत्तसंस्था)
दोन दहशतवादी ठार
काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी रविवारी रात्री दोन अज्ञात दहशतवाद्यांना ठार मारले, तर तिसºयाला जिवंत पकडले. खुदवाणी भागात दहशतवादी असल्याची निश्चित माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षादलांनी त्याला वेढा घालून शोध सुरू केला. त्या वेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.
त्यांना सुरक्षादलांनी तसेच प्रतिउत्तर दिले. त्यात दोन दहशतवादी ठार झाले, तर तिसºयाला जिवंत पकडण्यात यश मिळाले. हे दहशतवादी कोणत्या गटाचे आहेत, हे अजून निश्चित समजलेले नाही, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. अशाच प्रकारच्या चकमकीत शनिवारी रात्री शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारले होते. तिसरा दहशतवादी शरण आला होता.