हार घातले, वऱ्हाडीही जेवले, पण सातव्या फेऱ्यापूर्वीच दिला लग्नास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 07:21 AM2021-06-27T07:21:38+5:302021-06-27T07:21:46+5:30
झाशीच्या कुलपहाडच्या मुढारी गावातून महोबा येथे हे वऱ्हाड आले होते. वधू पक्षाने वऱ्हाडींचे जोरात स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात वऱ्हाडी नाचत होते. वधू- वराने एकमेकांना हार घातले. स्टेजवर फोटो काढले.
महोबा : उत्तर प्रदेशातील महोबात एका विवाह सोहळ्यात सात फेरे घेण्याचा विधी सुरू होता. एका नाट्यमय घडामोडीत वधूने अचानक सातवा फेर घेण्यास नकार दिला तेव्हा उपस्थित वऱ्हाडी आश्चर्यचकित झाली. आपल्याला नवरदेव पसंत नसल्याचे सांगत तिने लग्न करण्यास नकार दिला.
झाशीच्या कुलपहाडच्या मुढारी गावातून महोबा येथे हे वऱ्हाड आले होते. वधू पक्षाने वऱ्हाडींचे जोरात स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात वऱ्हाडी नाचत होते. वधू- वराने एकमेकांना हार घातले. स्टेजवर फोटो काढले. वऱ्हाडींनी जेवण केले. इथपर्यंत सर्वकाही सुरळीत चालले होते. मात्र, सात फेर घेत असताना सातवा फेर पूर्ण होण्याआधीच वधू थांबली. कुटुंबीयांनी तिला विचारणा केली असता तिने सांगितले की, हे लग्न मी करणार नाही. मुलगा मला पसंत नाही.या घटनेनंतर अर्ध्या रात्री पंचायतीची बैठक झाली. दोन्ही बाजूंकडील लोक वधूला समजावून सांगत होते; पण तिने कुणाचेही ऐकले नाही. तिने लग्नास ठाम नकार दिला. त्यानंतर हे वऱ्हाड जड पावलांनी परत गेले.