किंगफिशरच्या याचिकेवर विचार करण्यास नकार

By Admin | Published: September 3, 2014 02:29 AM2014-09-03T02:29:15+5:302014-09-03T02:29:15+5:30

युनायटेड बँक ऑफ इंडियाने ‘विलफुल डिफाल्टर’ घोषित केल्याच्या विरोधात किंगफिशर एअरलाईन्सने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने विचार करण्यास नकार दिला.

Refusing to consider Kingfisher petition | किंगफिशरच्या याचिकेवर विचार करण्यास नकार

किंगफिशरच्या याचिकेवर विचार करण्यास नकार

googlenewsNext
नवी दिल्ली : युनायटेड बँक ऑफ इंडियाने ‘विलफुल डिफाल्टर’ घोषित केल्याच्या विरोधात किंगफिशर एअरलाईन्सने दाखल केलेल्या याचिकेवर  सर्वोच्च न्यायालयाने विचार करण्यास नकार दिला. बँकेच्या तक्रार निवारण समितीने यासंदर्भात अगोदरच निर्णय दिला आहे. त्यामुळे किंगफिशर एअरलाईन्सची याचिका निर्थक ठरली आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. तुमची तक्रार होती की, तक्रार निवारण समितीने या प्रकरणी निर्णय घ्यायला नको होता, परंतु समितीने अगोदरच निर्णय घेतला आहे. तेव्हा आपली याचिका निर्थक ठरली आहे, असे न्या. ए.आर. दवे आणि न्या. यू.यू. ललित यांचे पीठ म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Refusing to consider Kingfisher petition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.