पाणी जपून वापरा प्रशासनाचे दुर्लक्ष : पाणीपुरवठा विभागातर्फे सुधारीत वेळापत्रक जाहीर

By admin | Published: January 24, 2016 10:20 PM2016-01-24T22:20:31+5:302016-01-24T22:20:31+5:30

जळगाव: जलवाहिनी दुरुस्तीसाठी २३ रोजीचा पाणीपुरवठा खंडित होणार असल्याने पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर पडणार असल्याचे पूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र दुरुस्तीचे काम लांबल्याने पाणीपुरवठा आणखी दोन दिवस लांबणीवर पडला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आणखीदोन दिवसांनी म्हणजे एकूण तीन दिवसांनी पुढे ढकलले गेले असून २३ रोजीचा पाणीपुरवठा २६ रोजी तर २४ रोजीचा २७ रोजी तर २५ रोजीचा पाणीपुरवठा २८ रोजी होणार आहे.

Regardless of the administration's use of water, the government has announced an updated schedule by the Water Supply Department | पाणी जपून वापरा प्रशासनाचे दुर्लक्ष : पाणीपुरवठा विभागातर्फे सुधारीत वेळापत्रक जाहीर

पाणी जपून वापरा प्रशासनाचे दुर्लक्ष : पाणीपुरवठा विभागातर्फे सुधारीत वेळापत्रक जाहीर

Next
गाव: जलवाहिनी दुरुस्तीसाठी २३ रोजीचा पाणीपुरवठा खंडित होणार असल्याने पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर पडणार असल्याचे पूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र दुरुस्तीचे काम लांबल्याने पाणीपुरवठा आणखी दोन दिवस लांबणीवर पडला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आणखीदोन दिवसांनी म्हणजे एकूण तीन दिवसांनी पुढे ढकलले गेले असून २३ रोजीचा पाणीपुरवठा २६ रोजी तर २४ रोजीचा २७ रोजी तर २५ रोजीचा पाणीपुरवठा २८ रोजी होणार आहे.
सुधारीत वेळापत्रक पाणीपुरवठा विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. ते असे-
२६ रोजीचा पाणीपुरवठा
वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकरनगर, आसोदारोड व परिसर,
मेहरूण परिसर पहिला दिवस- रामेश्वर कॉलनी, एमडीएस कॉलनी, मास्टर कॉलनी, अक्सानगर परिसर.
अयोध्यानगर परिसर- शांतीनिकेतन, गृहकुल कॉलनी, म्हाडा कॉलनी, अजिंठा सोसायटी,
नित्यानंदनगर टाकीपरिसर- मोहननगर, नेहरूनगर परिसर.
खंडेरावनगर परिसर- हरीविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण परिसर.
मानराज टाकीवरील भाग-दांडेकरनगर, मानराजपार्क, आसावानगर, निसर्गकॉलनी.
खोटेनगर टाकीवरील भाग- द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी परिसर, खोटेनगर.
गेंदालालमिल टाकीवरील- शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी परिसर. योगेश्वरनगर, हिरा पाईप, शंकरराव नगर व खेडीगाव परिसर.
डीएसपी बायपास पहिला दिवस- तांबापुरा, शामा फायरसमोरील परिसर.
गिरणा टाकी आवारातील उंच टाकी-वाघनगर, हरिविठ्ठलनगर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर व इतर भाग.
डीएसपी टाकी पहिला दिवस- जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी परिसर. ऑफीसर क्लब टाकी परिसर.
इन्फो-२७ रोजीचा पाणीपुरवठा
खंडेरावनगर दुसरा दिवस-पिंप्राळा गावठाण, उर्वरीत भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबानगर, मानराज टाकी दुसरा दिवस- शिंदेनगर, अष्टभुजा, वाटीकाश्रम परिसरातील राहिलेला भाग.
खोटेनगर टाकीवरील राहिलेला भाग- निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा, आहुजानगर, निमखेडी भागातील राहिलेला परिसर
नित्यानंद टाकी दुसरा दिवस- नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर परिसरातील उर्वरीत भाग.
डीएसपी टाकी- सानेगुरूजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर,यशवंतनगर परिसरातील उर्वरीत भाग. गिरणा टाकी आवारातील उंच टाकी, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी व इतर परिसर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील उर्वरीत भाग.
२८ रोजीचा पाणीपुरवठा
नटराज टाकी ते चौघुले मळापर्यंतचा भाग, शनीपेठ, बळीराम पेठ, नवीपेठ, हौसिंग सोसायटी, शाहूनगर, प्रतापनगर, गेंदालाल मिल टाकीवरील भाग, खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर, के.सी. पार्क, गेंदालाल मिल हुडको,
रिंगरोड संपूर्ण- भोईटेनगर, भिकमचंद जैन नगर,
आकाशवाणी टाकीवरील संपूर्ण भाग- जुनेगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, हेमुकलाणी टाकीवरील परिसर- गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी व इतर परिसर. सुप्रिम कॉलनी परिसर.
डीएसपी टाकीवरून पहिला दिवस- तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर व इतर परिसर. १५ इंची व्हॉल्व- प्रभात कॉलनी, ब्रुकबॉण्ड कॉलनी.

Web Title: Regardless of the administration's use of water, the government has announced an updated schedule by the Water Supply Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.