"चाहे आप कोई मजहब के हो..."; आयेशा आत्महत्येनंतर ओवैसी यांचं 'हे' विधान ठरलंय चर्चेचा विषय
By पूनम अपराज | Published: March 3, 2021 07:19 PM2021-03-03T19:19:36+5:302021-03-03T19:20:59+5:30
Ayesha suicide : ओवेसी पुढे म्हणाले की, अहमदाबादमध्ये एका मुस्लिम मुलीने आत्महत्या केल्याचा एक वेदनादायक व्हिडिओ समोर आला आहे.
पतीच्या हुंड्याच्या त्रासाला कंटाळून अहमदाबादच्या साबरमती नदीत उडी घेऊन हसत हसत आयुष्य संपवणाऱ्या आयेशाच्या मृत्यूबद्दल अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी परखड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण कोणत्याही धर्मातील असलात तरी हुंड्याचे लोभ दूर करा असे मी आपणा सर्वांना आवाहन करीत असल्याचे त्यांनी एका भाषणात म्हटले आहे. या त्यांच्या विधानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
ओवैसी पुढे म्हणाले की, अहमदाबादमध्ये एका मुस्लिम मुलीने आत्महत्या केल्याचा एक वेदनादायक व्हिडिओ समोर आला आहे. मी आपणा सर्वांना आवाहन करीत आहे, धर्म काहीही असो, हुंडाबळीचा लोभ संपवा. आपण पुरुष असाल तर आपल्या पत्नीवर अत्याचार करणे हा मर्दपणा नाही. बायकोला मारहाण करणे म्हणजे पुरुषत्व नाही. बायकोकडे पैसे मागणे हे पुरुषत्व नाही. जर तुम्ही असे कृत्य करत असाल तर तुम्ही माणूस म्हणवण्यास योग्य नाही.
Video : आयशा आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा : पत्नीसमोरच पती करायचा असे काही...
ते पुढे म्हणाले, त्याने (आयेशाचा नवरा) निर्दोष मुलीवर अत्याचार केला. या त्रासाला कंटाळून तिने मोठं पाऊल उचललं. एका निरागस मुलीसोबत असे करताना अशा लोकांना लाज वाटायला हवी. मी अल्लाहला प्रार्थना करीन की अल्लाह तुमचं वाटोळं करो, एआयएमआयएम प्रमुख म्हणाले, प्रत्येक बापाचं दुःख तुम्ही समजू शकत नाही. मला असे बरेच बाप माहित आहेत जे आयुष्याच्या शेवटच्या क्षणी माझा हात धरतात आणि म्हणतात की, असदसाहेब मुलीच्या लग्नाची काही व्यवस्था करा. मरण्याअगोरद काहीतरी घडू द्या. काय झालं या लोकांना, अजून किती महिलांचा जीव आपण घेणार आहे?." तुम्ही कसले मर्द आहात? जे महिलांना मारता? तुमच्यातील माणुसकी मेली आहे का? असे किती लोक आहेत जे आपल्या पत्नीवर अत्याचार करतात? हुंड्यासाठी गर्भवती महिलांना मारहाण करत घराबाहेर काढता आणि स्वतःला मोठा देवदूत समजता. लक्षात ठेवा, आपण जगाला फसवू शकता आणि अल्लाहला नाही. पण, हे लक्षात असुद्या तुम्ही जगाला धोका देऊ शकता अल्लाह नाही. अल्ला सगळं पाहातोय तो पीडित व्यक्तीला नक्कीच पाठिंबा देईल. आयेशाच्या आत्महत्येविषयी ओवैसी यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे. लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर करत आहेत तसेच त्यांच्यवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
आयशा सुसाइड केस:
— News24 (@news24tvchannel) March 3, 2021
'बेटियों पर अत्याचार करने वालों तुम मर्द कहलाने के भी लायक़ नहीं हो : @asadowaisi#AyeshaSuicideCase#Ayeshapic.twitter.com/7kYFmhaC7i