प्रादेशिक पक्षांची मोट आव्हान नाही - जेटली
By admin | Published: June 6, 2016 02:02 AM2016-06-06T02:02:49+5:302016-06-06T02:02:49+5:30
प्रादेशिक पक्षांची मोट बांधून तयार होणारी राष्ट्रीय आघाडी भाजपला आव्हान उभे करण्याची शक्यता नाही. काँग्रेस दुबळी झाल्याने विरोधी पक्षात निर्माण झालेली पोकळी अशा आघाडीने भरून येणार नाही
नवी दिल्ली : प्रादेशिक पक्षांची मोट बांधून तयार होणारी राष्ट्रीय आघाडी भाजपला आव्हान उभे करण्याची शक्यता नाही. काँग्रेस दुबळी झाल्याने विरोधी पक्षात निर्माण झालेली पोकळी अशा आघाडीने भरून येणार नाही, असे मत अरुण जेटली यांनी वृत्तसंस्थेकडे व्यक्त केले.
अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, भाजपाचा स्पर्धक कोण? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हे स्पष्ट आहे की, विरोधक हे दुभंगले आहेत. राष्ट्रीय आघाडीचा जो विचार आहे तोच मुळात विफल आहे. यापूर्वीही असे प्रयत्न झाले आहेत.
काँग्रेस केवळ सहा राज्यांत सत्तेत आहे. कोणत्या पक्षाची आघाडी देशात भाजपाच्या विरुद्ध दुसऱ्या क्रमांकाचा प्रवाह बनू शकते?
असा प्रश्न केला असता जेटली म्हणाले की, काँग्रेस हळूहळू पराभवाकडे जात आहे. त्यामुळे हे निश्चित नाही की, भाजपाचा मुख्य विरोधक कोण आहे.