Registration for Vaccine: कोरोना लसीसाठी रजिस्टर करताय? 18+ साठी सायंकाळी 'या' वेळेपासून सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 07:58 AM2021-04-28T07:58:22+5:302021-04-28T08:08:37+5:30

Corona Vaccine Registration Time start from 4 PM for 18 years above, CoWIN app: देशात आधीच कोरोना लसीचा तुटवडा असताना केंद्र सरकारने १८ वर्षांवरील लोकांसाठी १ मे पासून लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच आज, २८ एप्रिलपासून लसीसाठी नोंदणी सुरु होणार असल्याचे सांगितल्याने मध्यरात्रीपासूनच अनेकांनी रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला.

Registration for Corona Vaccine: For 18 years and above registration starting at 4 p.m. on CoWIN app, website | Registration for Vaccine: कोरोना लसीसाठी रजिस्टर करताय? 18+ साठी सायंकाळी 'या' वेळेपासून सुरु होणार

Registration for Vaccine: कोरोना लसीसाठी रजिस्टर करताय? 18+ साठी सायंकाळी 'या' वेळेपासून सुरु होणार

googlenewsNext

देशात आधीच कोरोना लसीचा तुटवडा असताना केंद्र सरकारने १८ वर्षांवरील लोकांसाठी १ मे पासून लसीकरण (corona vaccination) करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच आज, २८ एप्रिलपासून लसीसाठी (Regitration from 28 april) नोंदणी सुरु होणार असल्याचे सांगितल्याने मध्यरात्रीपासूनच अनेकांनी रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यांचे जन्म वर्ष टाकताच ४५ वर्षांनंतरचेच रजिस्टर करू शकतात असा मेसेज येत आहे. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. (Age group 18 Years and above can be Regisred Online from Date 28/04/2021 4.00 pm for corona vaccine.)


१ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. यासाठी कोविन (CoWIN app) किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे (Arogya Setu App) कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. हे रजिस्ट्रेशन बुधवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून सुरु होणार आहे. ४५ वर्षांवरील लोकांसाठी रजिस्ट्रेशन आधीसारखेच उपलब्ध असणार आहे. 


कोरोना लस हवी असेल तर त्यासाठी तुमचे वय त्यामध्ये बसणे गरजेचे आहे. तसेच यासाठी www.cowin.gov.in किंवा को-विन अॅप द्वारे रजिस्टर करता येणार आहे. यामध्ये तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागणार आहे. रजिस्टर करताना तुमच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्राव्हिंग लायसन किंवा मतदार ओळखपत्र असणे गरजेचे आहे. त्यावरील आयडी नंबर आणि इतर माहिती तंतोतंत जुळणारी टाकावी लागणार आहे. 


जाणून घ्या कशी असेल रजिस्ट्रेशन प्रोसेस....

  • www.cowin.gov.in या अधिकृत साईटवर जा.
  • Register/ Sign in yourself  मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
  • तुम्हाला OTP येईल तो तेथे टाका व क्लिक करा.
  • Vaccine Registraction form भरा. 
  • schedule appointment वर क्लिक करा.
  • पिन कोड टाका (उदा.422601)
  • Sesstion निवडा-  सकाळचे किंवा दुपारचे.
  • Vaccin center व Date निवडा.
  • Appointment book करून ती conform करा.
  • Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
  • हा मेसेज जपून ठेवा, लसीकरण केंद्रावर तुमचे ओळखपत्र आणि हा मेसेज दाखविल्यास लस देणे सोपे होईल.
     

Read in English

Web Title: Registration for Corona Vaccine: For 18 years and above registration starting at 4 p.m. on CoWIN app, website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.