सरकारी वाहनांच्या नाेंदणीचे नूतनीकरण हाेणार नाही, १ एप्रिलपासून नवा नियम हाेणार लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 06:35 AM2021-03-14T06:35:28+5:302021-03-14T06:37:22+5:30

परिवहन मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचना काढून सूचना मागविल्या आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्व केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, नगरपालिका, महापालिका, स्वायत्त संस्था तसेच केंद्रशासित प्रदेशांसाठी नवा नियम लागू हाेईल.

Registration of government vehicles will not be renewed, new rules will come into effect from April 1 | सरकारी वाहनांच्या नाेंदणीचे नूतनीकरण हाेणार नाही, १ एप्रिलपासून नवा नियम हाेणार लागू

सरकारी वाहनांच्या नाेंदणीचे नूतनीकरण हाेणार नाही, १ एप्रिलपासून नवा नियम हाेणार लागू

Next

नवी दिल्ली : केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्रालयाने वाहन नाेंदणीचा प्रस्ताव दिला. ताे मंजूर झाल्यास १ एप्रिल २०२२ पासून सरकारी कार्यालयांच्या १५ वर्षे जुन्या वाहन नाेंदणीचे नुतनीकरण हाेणार नाही. (Registration of government vehicles will not be renewed, new rules will come into effect from April 1)

परिवहन मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचना काढून सूचना मागविल्या आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्व केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, नगरपालिका, महापालिका, स्वायत्त संस्था तसेच केंद्रशासित प्रदेशांसाठी नवा नियम लागू हाेईल. याबाबत मंत्रालयाने ट्विट करुन माहिती दिली आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात वाहन भंगार धाेरण जाहीर करण्यात आले. खासगी वाहनांची २० तर व्यावसायिक वाहनांची १५ वर्षांनी फिटनेस चाचणी करणे बंधनकारक हाेणार आहे. त्यानुसार अधिसूचना काढण्यात आली असून सूचना पाठविण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Web Title: Registration of government vehicles will not be renewed, new rules will come into effect from April 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.