गुजरातच्या खासगी बसेसची नोंदणी अरुणाचल प्रदेशमध्ये, ऑपरेटर्संचा असाही जुगाड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 12:40 PM2022-04-09T12:40:34+5:302022-04-09T12:41:53+5:30

वाहनाची नोंदणी इकडे केल्यामुळे दरमहा अंदाजे 38000 रुपयांचा टॅक्स त्यांचा वाचत आहेत. 

Registration of private buses in Gujarat in Arunachal Pradesh | गुजरातच्या खासगी बसेसची नोंदणी अरुणाचल प्रदेशमध्ये, ऑपरेटर्संचा असाही जुगाड

गुजरातच्या खासगी बसेसची नोंदणी अरुणाचल प्रदेशमध्ये, ऑपरेटर्संचा असाही जुगाड

Next

अहमदाबाद - टॅक्स वाचविण्यासाठी गुजरातच्या खासगी बस चालकांनी जुगाड सुरू केला आहे. गुजरातऐवजीअरुणाचल प्रदेशच्या रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये वाहनाची नोंदणी करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. वाहनाची नोंदणी इकडे केल्यामुळे दरमहा अंदाजे 38000 रुपयांचा टॅक्स त्यांचा वाचत आहेत. 

अखिल गुजरात टूरिस्ट व्हेइकल ऑपरेटर फेडरेशन (एजीटीवीओएफ) च्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी आणि यापूर्वीही जवळपास 25 खासगी ऑपरेटर्संने अरुणाचल प्रदेशमध्ये आपले ऑफिस सुरू केले आहे. आपल्या वाहनाची नोंदणी येथे करण्यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. गुजरातमध्ये नोंदणी असलेल्या जवळपास 1,000 आंतरराज्यीय स्लीपर बसची नोंदणी गेल्या 1 वर्षात अरुणाचल प्रदेशच्या आरटीओ कार्यालयात ट्रान्सफर करण्यात आली आहे. 

गुजरातऐवजी अरुणचल प्रदेशमध्ये नोंदणी केल्याने दरमहा जवळपास 38 हजार रुपयांच्या टॅक्सची बचत होते. दरम्यान, गुजरातमध्ये दरमहा 40 हजार रुपयांच्या तुलनेत अरुणाचल प्रदेशमध्ये केवळ 2 हजार रुपयेच टॅक्स घेतला जातो. 

एजीटीवीओएफचे सेक्रेटरी राजेंद्र ठाकेर यांनी सांगितले की, 'केंद्राने गतवर्षी इंटरस्टेट बससेवांसाठी ऑल इंडिया परमिटची सुरुवात केली, त्यासाठी खासगी एसी बस ऑपरेटर्संना दरवर्षी 3 लाख रुपये भरावे लागतात. जर, त्रैमासिक पैसै भरल्यास एकूण 3.60 लाख रुपयांचा भरणा करावा लागतो. त्यानंतर, राज्याचाही टॅक्स द्यावा लागतो. तुलनेत अरुणचल मध्ये हा टॅक्स कमी असल्याने नोंदणी तिकडे करण्यात येत आहे. 
 

Web Title: Registration of private buses in Gujarat in Arunachal Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.