संतापजनक! काश्मीरमध्ये शहीद जवानाच्या अंत्ययात्रेवरही दगडफेक
By admin | Published: May 10, 2017 07:41 PM2017-05-10T19:41:36+5:302017-05-10T19:48:20+5:30
जम्मू आणि काश्मीरमध्ये होत असलेल्या दगडफेकीच्या घटनांनी आता मर्यादा ओलांडण्यास सुरुवात केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - जम्मू आणि काश्मीरमध्ये होत असलेल्या दगडफेकीच्या घटनांनी आता मर्यादा ओलांडण्यास सुरुवात केली आहे. आज दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केलेले लष्कराचे अधिकारी उमर फयाज यांच्या अंत्ययात्रेवर फुटीरतावाद्यांनी दगडफेक केली. दहशवाद्यांच्या निर्घृण कृत्यात शहीद झालेल्या फयाज यांना आज पूर्ण सरकारी इतमामात सुपूर्द ए खाक करण्यात आले.
यासंदर्भातील वृत्त मुंबई मिररने दिले आहे. कुलगाम येथील रहिवासी असलेले फयाज सध्या सुटीवर होते. ते आपल्या काकांच्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी बातापूरा भागात गेले होते. तेथे मंगळवारी रात्री 10च्या सुमारास दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. आज सकाळी त्यांचा गोळ्यांनी छिन्नविछिन्न केलेला मृतदेह सापडला होता. दरम्यान, काश्मीरमधील या घटनेनंतर लष्कराने सुटीवर गेलेल्या जवानांना अलर्ट केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी फयाज यांचे अपहरण करून त्यांना एका बागेत घेऊन गेले. तेथे त्यांना पाच गोळ्या मारण्यात आल्या. दरम्यान सकाळी फयाज यांचा मृतदेह एका स्थानिक रहिवाशाला मिळाला. त्यानंतर त्याने याची माहिती पोलिसांना दिली.
शोपियन जिल्ह्यातील गावांमध्ये सध्या मोठया प्रमाणावर दहशतवादविरोधी मोहिम राबवली जात आहे. शोपियनमध्ये जवानांवर झालेले हल्ले आणि अनेक दहशतवादी मोकाट फिरत असल्याचे व्हिडीओमधून समोर आल्यानंतर लष्कराने शोपियनमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरु केली आहे.