मार्जीनस्पेसमधील लोखंडी जिने करणार नियमित मनपा : अवैध नळकनेक्शनधारकांसाठी अभय योजना

By admin | Published: April 8, 2016 12:02 AM2016-04-08T00:02:54+5:302016-04-08T00:02:54+5:30

जळगाव : मनपातर्फे नागरिकांनी मार्जीनस्पेसमध्ये अनधिकृतपणे बांधलेले लोखंडी जिने प्रिमियम आकारून नियमित करण्यात येणार आहेत. त्यासाठी नगररचनाने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापौर नितीन ल‹ा यांनी गुरुवारी आढावा बैठकीत दिले.

Regular municipal corporation will be made of iron ore in MarineSpeed: Abhay Yojna for illegal land holders | मार्जीनस्पेसमधील लोखंडी जिने करणार नियमित मनपा : अवैध नळकनेक्शनधारकांसाठी अभय योजना

मार्जीनस्पेसमधील लोखंडी जिने करणार नियमित मनपा : अवैध नळकनेक्शनधारकांसाठी अभय योजना

Next
गाव : मनपातर्फे नागरिकांनी मार्जीनस्पेसमध्ये अनधिकृतपणे बांधलेले लोखंडी जिने प्रिमियम आकारून नियमित करण्यात येणार आहेत. त्यासाठी नगररचनाने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापौर नितीन ल‹ा यांनी गुरुवारी आढावा बैठकीत दिले.
करांच्या वसुलीसाठी महापौरांनी उपायुक्त प्रदीप जगताप, नगररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम, सर्व प्रभाग अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. तसेच अवैध नळकनेक्शन कायम करण्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या कालावधित दंड माफ करून केवळ नळकनेक्शनसाठीचे पैसे भरून कनेक्शन नियमित करून देण्यात येणार आहे. अशाच प्रकारे खुला भूखंड कराच्या वसुलीसाठीही अभय योजना राबविली जाणार आहे. मोबाईल टॉवरच्या वसुलीसाठी विधी सल्लागार व नगररचना सहायक संचालकांनी अभ्यास करून ३० एप्रिलपर्यंत अहवाल द्यावा. त्यानुसार योग्य आकारणी या मोबाईल टॉवर्सवर करून मुदत दिली जाईल. या मुदतीत संबंधित कराचा भरणा न केल्यास टॉवर सील केले जाणार आहेत.

Web Title: Regular municipal corporation will be made of iron ore in MarineSpeed: Abhay Yojna for illegal land holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.