विमान प्रवासासाठी आली नियमावली; प्राधिकरणाने जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 03:24 AM2020-05-22T03:24:03+5:302020-05-22T06:00:36+5:30

सर्व खबरदारी घेत विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) गुरुवारी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याअंतर्गत विमानतळ टर्मिनल इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांना थर्मल चेक मशीनमधून जाणे बंधनकारक असेल.

Regulations for air travel; Guidelines issued by the Authority | विमान प्रवासासाठी आली नियमावली; प्राधिकरणाने जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना

विमान प्रवासासाठी आली नियमावली; प्राधिकरणाने जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना

Next

नवी दिल्ली : कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असून, भारताला त्याचा फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटापायी देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू
असून, सर्वच उद्योगधंदे ठप्प आहेत. रेल्वे आणि विमानसेवाही बंद आहे. पण केंद्र सरकारनं आता २५ मेपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच तिकीटांचेदरही निश्चित केले आहेत. त्यानुसार ४० मिनिटांपेक्षा कमी प्रवासासाठी दोन हजार ते जास्तीत जास्त सहा हजार, १८० मिनिटे ते २१० मिनिटांदरम्यानच्या प्रवासासाठी ६,५०० ते १८,६०० असे दर असतील.
सर्व खबरदारी घेत विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) गुरुवारी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याअंतर्गत विमानतळ टर्मिनल इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांना थर्मल चेक मशीनमधून जाणे बंधनकारक असेल. तसेच प्रवाशांनी त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करून ठेवणे बंधनकारक केले आहे. विमानतळावर जाण्यापूर्वी अशा काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाच्या आहेत.
नागरी उड्डयन मंत्री म्हणाले की, उड्डाणे कमी होऊ शकतात, विमानातील काही जागा रिक्त ठेवून उड्डाण करणं व्यावहारिक ठरणार नाही, कारण यामुळे तिकिटांच्या किमती वाढतील. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं असून, २५ मार्चपासून देशातील सर्व व्यावसायिक प्रवासी उड्डाणे बंद करण्यात
आली आहेत.
स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. हा निर्णय देशातील सर्वांगीण आर्थिक वातावरणाला बळकटी देण्यासाठी दूरगामी सिद्ध होईल. आॅपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी एसओपी आणि उड्डाणांच्या तपशिलांची अद्याप प्रतीक्षा आहे.

हवाई प्रवासाचे तिकीटदर निश्चित : हरदीपसिंह पुरी
कोरोना संकटाच्या काळात विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी तीन महिन्यांसाठी हे कमाल किमान दर निश्चित करण्यात आले आहेत. दिल्ली आणि मुंबई ९० ते १२० मिनिटांच्या विमान प्रवासासाठी कमीतकमी ३५०० रुपये आणि जास्तीतजास्त १० हजार रुपये असणार आहे. हे दर २४ आॅगस्टपर्यंत हे लागू राहणार असल्याची माहिती हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली. हरदीपसिंग पुरी म्हणाले की, देशांतर्गत वाहतूक सेवेच्या अनुभवावरच आम्ही आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा विचार करणार असल्याचे हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विमान वाहतूक सुरू झाल्यानंतर मेट्रो ते मेट्रो शहरांसाठी स्वतंत्र नियम आणि नॉन मेट्रो शहरांसाठी वेगळे नियम असणार आहेत.

सध्या प्रवासाच्या वेळेनुसार
सात प्रकार निश्चित करण्यात
आले आहेत.
- ४0 मिनिटांपेक्षा कमी वेळ
- ४0 ते ६0 मिनिटं
- ६0 ते ९0 मिनिट
- ९0 ते १२0 मिनिट
- १२0 ते १५0 मिनिटं
- १५0 ते १८0 मिनिटं
- १८0 ते २१0 मिनिटं

मार्गदर्शन सूचना
- प्रवाशांनी विमान सुटण्याच्या वेळेच्या दोन तास आधी पोहोचले पाहिजे.
- ज्यांची उड्डाणे चार तासांच्या आत असतील, त्या प्रवाशांना टर्मिनल इमारतीत जाण्याची परवानगी देण्यात येईल.
- सर्व प्रवाशांनी मास्क आणि हातमोजे घालणे आवश्यक आहे.
- प्रवाशांना थर्मल स्क्रीनिंग करावी लागणार आहे.
- प्रवाशांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असणे महत्त्वाचे आहे.
- ज्यांच्याकडे 'ग्रीन' पर्याय नसेल किंवा शासकीय संपर्क ट्रेसिंग अ‍ॅप नसेल तर त्यांना प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.
- विशिष्ट कारणांशिवाय प्रवाशांच्या ट्रॉलीला मंजुरी दिली जाणार नाही. तिचे निर्जंतुकीकरण करावे लागेल.
- राज्य सरकार आणि प्रशासनाने प्रवासी आणि एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक आणि खासगी टॅक्सी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
- खासगी वाहने किंवा निवडक कॅब सेवांना प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना विमानतळावर नेण्याची परवानगी असेल.

Web Title: Regulations for air travel; Guidelines issued by the Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.