भूसंपादनात अडकले चार गावांचे पुनवर्सन नया अंदुरा,वाई प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील गावांचा समावेश

By admin | Published: May 9, 2015 01:45 AM2015-05-09T01:45:05+5:302015-05-09T01:45:05+5:30

रखडलेले पुनर्वसन

Rehabilitation of four villages stuck in the land acquisition include new Andorra, villages in the vulnerable areas of Y. | भूसंपादनात अडकले चार गावांचे पुनवर्सन नया अंदुरा,वाई प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील गावांचा समावेश

भूसंपादनात अडकले चार गावांचे पुनवर्सन नया अंदुरा,वाई प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील गावांचा समावेश

Next
डलेले पुनर्वसन
...........................................
अकोला : जिल्‘ातील नया अंदुरा आणि वाई संग्राहक प्रकल्प या दोन सिंचन प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रातील चार गावांच्या पुनर्वसनासाठी भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन भूसंपादनात अडकले आहे.
नया अंदुरा सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील अंत्री मलकापूर, उरळ बु. व उरळ खुर्द या तीन गावांच्या पुनवर्सनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे तसेच वाई संग्राहक सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील सुलतानपूर गावाचे खरप नवले शिवारात पुनर्वसन करण्याच्या प्रस्तावालाही शासनामार्फत मंजूरी देण्यात आली आहे. दोन्ही प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रातील चारही गावांच्या पुनर्वसन प्रस्तावाला शासनाकडून मान्यता देण्यात आली असली तरी या गावांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची प्रक्रिया मात्र अद्याप रखडली आहे. त्यामुळे नया अंदुरा आणि वाई प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन भूसंपादनाच्या प्रक्रियेत अद्याप अडकलेलेच आहे. गावाच्या पुनर्वसनासाठी भूसंपादनास शासनामार्फत केव्हा मान्यता मिळणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.
कोट..............................................................
नया अंदुरा आणि वाई संग्राहक या दोन्ही सिंचन प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रातील चार गावांच्या पुनर्वसनास शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे; मात्र भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप बाकी असल्याने, पुनवर्सनाचे काम रखडले आहे. पुनर्वसनाकरिता आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- जी. डब्ल्यू. सुरंजे
उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन)

Web Title: Rehabilitation of four villages stuck in the land acquisition include new Andorra, villages in the vulnerable areas of Y.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.