चीनची पुन्हा घुसखोरी, अरुणाचलमध्ये केला प्रवेश

By admin | Published: June 14, 2016 07:22 AM2016-06-14T07:22:15+5:302016-06-14T07:22:15+5:30

चीनने पुन्हा एकदा भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे, पिपल्स लिबरेशन आर्मीच्या 250 जवानांनी गेल्याच आठवड्यात अरुणाचल प्रदेशमधील कामेंग येथे वेश केला होता.

Reinforcement of China, entry into Arunachal | चीनची पुन्हा घुसखोरी, अरुणाचलमध्ये केला प्रवेश

चीनची पुन्हा घुसखोरी, अरुणाचलमध्ये केला प्रवेश

Next
>ऑनलाइन लोकमत - 
इटानगर, दि. 14 - चीनने पुन्हा एकदा भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्याच आठवड्यात अरुणाचल प्रदेशमधील कामेंग येथे चीन लष्कराने प्रवेश केला होता. पिपल्स लिबरेशन आर्मीचे 250 जवान या घुसखोरीत सामील होते अशी माहिती भारतीय लष्कराच्या सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र अरुणाचलमध्ये प्रवेश केल्याच्या काही तासातच जवान माघारी फिरले.
 
(26/11 मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं चीनने केलं मान्य)
 
चीनने याअगोदरही भारतामध्ये अनेकवेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. याचे पुरावेही वारंवार भारताने सादर केले आहेत. मात्र चीनने अद्यापही घुसखोरी रोखलेली नाही आहे. 9 जूनला कामेंगच्या पुर्वेकडे चीनच्या गस्त विभागाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. विेशेष म्हणजे भारताला अणु पुरवठादार समूहाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळण्यावरुन चीन विरोध करत असताना अगोदरच दोन्ही देशांमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे, आणि त्याचवेळी चीनकडून ही घुसखोरी झाली आहे. 
 
(NSG वरुन चीनला रोखण्यासाठी मोदींचा पुतीन यांना फोन)
 
चीनने यावर्षी घुसखोरी करण्याची ही पहिलीच घटना आहे. चीनने हा आमचा भाग असल्याचा दावा वारंवार केला आहे. चीन लष्कराच्या जवानांनी परत फिरण्याअगोदर सीमारेषेवर तीन तास घालवले असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळाली आहे. 
 

Web Title: Reinforcement of China, entry into Arunachal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.