सम-विषम फार्म्युल्यावरील सुनावणीस हायकोर्टाचा नकार
By admin | Published: February 20, 2016 03:25 AM2016-02-20T03:25:11+5:302016-02-20T03:25:11+5:30
दिल्लीत येत्या १५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सम-विषम योजनेतून महिला व दुचाकी वाहनांना सूट देण्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आ
नवी दिल्ली : दिल्लीत येत्या १५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सम-विषम योजनेतून महिला व दुचाकी वाहनांना सूट देण्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ही याचिका सुनावणीसाठी दाखल करणे अपरिपक्वपणाचे ठरेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
ही याचिका पब्लिक इंटरेस्टसाठी नसून ‘फक्त पब्लिसिटी इंटरेस्टसाठी’ आहे, असे मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्या. जयंत नाथ यांच्या पीठाने स्पष्ट केले. ही रिट याचिका अपरिपक्व आहे. ती जनहितासाठी आहे, असे आम्हाला वाटत नाही. ती फक्त प्रसिद्धीच्या हेतूने दाखल केली आहे. त्यामुळे सुनावणीस घेऊ शकत नाही, असेही या पीठाने स्पष्ट केले.