अमित शहांच्या सुरक्षा खर्चाची माहिती देण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 06:39 AM2018-08-27T06:39:27+5:302018-08-27T06:39:52+5:30

केंद्रीय माहिती आयोगाचा पवित्रा

Rejecting information about Amit Shah's security expenses | अमित शहांच्या सुरक्षा खर्चाची माहिती देण्यास नकार

अमित शहांच्या सुरक्षा खर्चाची माहिती देण्यास नकार

googlenewsNext

नवी दिल्ली : भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर किती खर्च होतो याची माहिती ही वैयक्तिक स्वरुपाची व सुरक्षेशी संबंधित असल्याने ती उघड करता येणार नाही, असे केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले आहे. हा तपशील मिळावा म्हणून दीपक जुनेजा यांनी माहितीच्या अधिकाराखाली आयोगाकडे अर्ज दाखल केला होता.

सार्वजनिक कार्याशी निगडित नसलेली व वैयक्तिक स्वरुपाची माहिती उघड करण्यास माहिती अधिकार कायद्याच्या कलम ८ (१)(ज) कलमाद्वारे मनाई करण्यात आली आहे. त्या तरतुदीचा आधार घेत केंद्रीय माहिती आयोगाने शहा यांच्या विषयीची माहिती देण्यास नकार दिला. भाजपाध्यक्षअमित शाह यांच्याकडे कोणतेही सरकारी पद नसताना जुलै २०१४ पासून गृह मंत्रालयाने त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली होती. यासाठी जनतेच्या कराचा पैसा वापरला गेला. त्यामुळे याची माहिती मिळावी, अशी मागणी दीपक जुनेजा यांनी केली होती.

Web Title: Rejecting information about Amit Shah's security expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.