वहिनी, पोलिसांच्या त्रासाने कंटाळून वृद्धाची आत्महत्या आत्महत्या पूर्वचिठ्ठीबाबत गोपनियता : निमखेडी येथील मयताच्या नातेवाइकांचा रास्तारोको
By Admin | Published: February 8, 2016 10:55 PM2016-02-08T22:55:52+5:302016-02-08T22:55:52+5:30
जळगाव- घराशेजारीच रहिवासाला असलेल्या वहिनीचा त्रास आणि तिच्या माध्यमातून पैसे उपटणारे काही पोलीस यांच्या त्रासामुळे निमखेडी येथील वृद्धाने रेल्वेखाली आत्महत्या केली. सोमवारी सकाळी चंदूअण्णानगरनजीक हा प्रकार उघडकीस आला. वृद्धाने आत्महत्या पूर्वचिठ्ठी लिहिली आहे. ती मात्र तालुका पोलिसांनी दाखविली नाही. तर या आत्महत्येमागे पोलिसातील कुठलाही कर्मचारी जबाबदार नाही, असा खुलासा तालुका पोलिसातील निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी केला आहे.
ज गाव- घराशेजारीच रहिवासाला असलेल्या वहिनीचा त्रास आणि तिच्या माध्यमातून पैसे उपटणारे काही पोलीस यांच्या त्रासामुळे निमखेडी येथील वृद्धाने रेल्वेखाली आत्महत्या केली. सोमवारी सकाळी चंदूअण्णानगरनजीक हा प्रकार उघडकीस आला. वृद्धाने आत्महत्या पूर्वचिठ्ठी लिहिली आहे. ती मात्र तालुका पोलिसांनी दाखविली नाही. तर या आत्महत्येमागे पोलिसातील कुठलाही कर्मचारी जबाबदार नाही, असा खुलासा तालुका पोलिसातील निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी केला आहे. रतिलाल उर्फ रतन बाविस्कर (वय ६५) रा.निमखेडी ता.जळगाव असे मयताचे नाव आहे. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून इंदूबाई शांताराम बाविस्कर (वय ६७) हीच्या विरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला. तिच्या अटकेसाठी पोलिसांनी दुपारपासून कार्यवाही केली, पण ती सापडली नाही. तिचा पती शांताराम बाविस्कर व मोठा मुलगा यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. रतन बाविस्कर यांनी मानसिक छळ व आर्थिक पिळवणुकीमुळे अडचणी निर्माण झाल्याने उद्वीग्न होऊन सुरत रेल्वे लाईनवर आत्महत्या केली. सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. आजूबाजूचे रहिवासी व वाहनधारकांना हा प्रकार लक्षात आला. घरकुलाच्या शौचालयावरून वाद, पोलिसांचा ससेमिरामयत रतन याच्या कुटुंबीयांना घरकूल बांधण्यासाठी जागा मिळाली होती. त्यांच्यानजीकच आरोपी इंदूबाई हिचे घर आहे. मयताच्या कुटुंबीयांनी या जागेवर शौचालय बांधू नये, असे इंदूबाईचे म्हणणे होते. यावरून दोघांमध्ये वाद झाले होते. हा वाद पोलिसात पोहोचला होता. इंदूबाईच्या तक्रारीनुसार मयत रतन याची पत्नी, मुलगा व सून यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांकडून चौकशीअदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर तालुका पोलिसातील नाईक संजय चौधरी यांनी मयत रतन याच्या कुटुंबीयांची चौकशी केली. रतनची पत्नी, मुलगा व सून यांना तालुका पोलिसात बोलाविले होते. तसेच कलम १४९ नुसार रतन याच्या कुटुंबीयांना नोटिसही पाठविली होती. ही चौकशी व वहिनी इंदूबाईचा त्रास यामुळे रतन हा त्रस्त झाला होता. पोलिसाने पैसे उपटल्याचा आरोपमयत रतनचे शव जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी आक्रोश केला. रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावर काही नातेवाइक उभे राहीले. त्यांनी रास्ता रोको केला. एका पोलिसाने चौकशीनंतर प्रकरण मिटविण्यासाठी चार हजार रुपये घेतले व आज सकाळी आणखी दोन हजार रुपये त्याला द्यायचे होते. चौकशांची भीती व पैशांचाअभावयाच्यानेनिराश,हताशझालेल्यारतनबाविस्करयांनीपोलीसवइंदूबाईमुळेआत्महत्याकेली.आरोपींनाअटककेलीजावी,अशीमागणीत्याच्यानातेवाइकांनीकेली.