जमात-ए-इस्लामीचे इसिससोबत होते संबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 04:08 AM2019-03-10T04:08:19+5:302019-03-10T04:09:29+5:30
अलिकडेच बंदी घातलेल्या जम्मू - काश्मिरातील सक्रीय संघटना जमात -ए-इस्लामी जम्मू काश्मीर या संघटनेचे पाकिस्तानातील आयएसआयशी संपर्क होता
नवी दिल्ली : अलिकडेच बंदी घातलेल्या जम्मू - काश्मिरातील सक्रीय संघटना जमात -ए-इस्लामी जम्मू काश्मीर या संघटनेचे पाकिस्तानातील आयएसआयशी संपर्क होता आणि ते लोक नवी दिल्लीमधील कार्यरत पाकिस्तानी उच्चायुक्तांशी सतत संपर्कात होते जेणेकरून फुटीरवादाला चालना मिळेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हुर्रियत कॉन्फ्रेसमध्ये जमात-ए-इस्लामीचे सर्वात महत्त्वाचे सदस्य सय्यद अली शाह जिलानी हे आहेत. एकेकाळी बंदी त्यांना ‘अमीर-ए-जिहाद’नावाने संबोधले जायचे. अधिकाऱ्याने सांगितले की, या संघटनेने पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयशी घनिष्ठ संबंध स्थापन केले होते. जेणेकरून काश्मिरी तरुणांना शस्त्रास्त्र उपलब्ध करुन देणे, प्रशिक्षण देणे ही कामे करता येतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमात-ए- इस्लामी संघटना शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये भारतविरोधी भावना भडकाविण्याचे काम करत होती. ही संघटना १९४५ मध्ये जमात-ए- इस्लामी हिंदचा एक भाग म्हणून स्थापन करण्यात आली होती. राजकीय मतभेदांमुळे १९५३ मध्ये ही संघटना वेगळी झाली. या संघटनेवर १९७५ मध्ये दोन वर्षांसाठी आणि १९९० मध्ये तीन वर्षांसाठी बंदी आणण्यात आली होती.