मंत्री, नेत्यांचे नातेवाईक ठरले तिकिटांचे लाभार्थी; झारखंड विधानसभेत घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 02:42 PM2024-10-21T14:42:37+5:302024-10-21T14:42:51+5:30

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार जोरदार सुरू

Relatives of ministers, leaders became beneficiaries of tickets; The issue of nepotism is again discussed in the Jharkhand Assembly | मंत्री, नेत्यांचे नातेवाईक ठरले तिकिटांचे लाभार्थी; झारखंड विधानसभेत घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

मंत्री, नेत्यांचे नातेवाईक ठरले तिकिटांचे लाभार्थी; झारखंड विधानसभेत घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने घराणेशाहीची पुरेपूर काळजी घेत तिकीट वाटप करताना राज्यातील सर्व माजी मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या कुटुंबाना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीट वाटपामुळे घराणेशाहीचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. या घराणेशाहीचा लाभ उठवत झारखंड मुक्ती मोर्चाला सोडचिठ्ठी दिलेले चंपाई सोरेन व त्यांचा मुलगा बाबूलाल सोरेने या दोघांनी तिकीट मिळविले आहे.

माजी मुख्यमंत्री, ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास यांची सून पूर्णिमा दास साहू यांना भाजपचे तिकीट मिळाले. भाजपच्या तिकीटावर दोन माजी मुख्यमंत्री स्वत: निवडणूक लढवत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींना भाजपने विधानसभेचे तिकीट दिले आहे. एका आजारी आमदाराच्या पत्नीला तर एका माजी आमदाराच्या मोठ्या भावाला उमेदवारी मिळाली आहे.

‘इंडिया’च्या जागा वाटपावर राजदची नाराजी

- झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीत तिकीट वाटपावरून नाराजीनाट्य सुरू झाले आहे. राज्यातील ८१ जागांपैकी ७० जागांवर काँग्रेस व झामुमा उमेदवार उभे करणार असल्याचा निर्णय इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला.
- इतर ११ जागा राष्ट्रीय जनता दल (राजद) व डाव्या पक्षांना सोडण्यात आल्या आहेत. जागा वाटपाचा हा फाॅर्म्युला समोर आल्यानंतर राजदने नाराजी व्यक्त केली आहे. 
- मुख्यमंत्री हेमंत सोरेन व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जागा वाटपासंदर्भात निश्चित केलेला फाॅर्म्युला राजदने फेटाळून लावला आहे. जागा वाटपात पक्षाला सन्मानजनक प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी गत दोन दिवसांपासून राजदचे नेते तेजस्वी रांचीमध्ये तळ ठोकून आहेत.

कुणाला मिळाली संधी?

सिमरियाचे विद्यमान आमदार आमदार किशुन दास यांच्याऐवजी उज्ज्वल दास यांना तिकीट दिले. कांके मतदारसंघात समरी लालऐवजी डॉ. जीतू चरण राम यांना तिकीट दिले. जमुआचे केदार हाजरा यांचे तिकीट कापून मंजू देवी यांना पक्षाने उमदेवारी दिली आहे. सिंदरीचे विद्यामान आमदार इंद्रजीत महतो यांना डावलून त्यांची पत्नी तारा देवीला भाजपने तिकीट दिले आहे. तीनवेळा झारखंडचे मुख्यमंत्री राहिलेले अर्जुन मुंडा यांची पत्नी मीरा मुंडा यांना मेनका सरदार यांची तिकीट कापून उमेदवारी दिली आहे. यासोबतच भाजपने राज्यात १२ महिलांना उमेदवारी दिली आहे.

आदिवासींसाठी...

- आदिवांसाठी (अनुसूचित जमाती) २८ जागा आरक्षित असून त्यापैकी २६ जागांवर भाजपने उमदेवार उभे केले आहेत.
- २८ पैकी एनडीएतील घटक पक्ष आजसूला  मनोहरपूर, पाकडू व लोहरदगा हे मतदारसंघ सोडले आहेत तर तमाड विधानसभा सीट जदयू पक्षाला दिले आहे.
- धनवार व जामताड या सर्वसाधारण मतदारसंघात बाबूलाल मरांडी व सीता सोरेन यांना उमेदवारी दिली आहे. तिकीट वाटपात घराणेशाहीची पुरेपूर काळजी घेणाऱ्या भाजपने चार विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले आहे.

Web Title: Relatives of ministers, leaders became beneficiaries of tickets; The issue of nepotism is again discussed in the Jharkhand Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.