नक्षलवाद्यांची कंबर तोडण्यासाठी सरकारची "हिट लिस्ट" जारी

By admin | Published: April 27, 2017 08:57 AM2017-04-27T08:57:28+5:302017-04-27T09:11:29+5:30

छत्तीसगड येथील सुकमामध्ये सीआरपीएफ जवानांवर भ्याड हल्ला करणा-या नक्षलवाद्यांची कंबर तोडण्यासाठी त्यांच्या म्होरक्यांनाच टार्गेट केले जाणार आहे.

Release of government's "hit list" to break the waist belt | नक्षलवाद्यांची कंबर तोडण्यासाठी सरकारची "हिट लिस्ट" जारी

नक्षलवाद्यांची कंबर तोडण्यासाठी सरकारची "हिट लिस्ट" जारी

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 27 - छत्तीसगड येथील सुकमामध्ये सीआरपीएफ जवानांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात 25 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली आहेत. या नक्षलवाद्यांची कंबर मोडण्यासाठी त्यांच्या म्होरक्यांनाच आता टार्गेट केले जाणार आहे. 
 
यासाठी केंद्र सरकारकडून एक विशेष योजना आखण्यात आली आहे.  केंद्र सरकारने या मोहीमे अंतर्गत सुरक्षा दलाला नक्षलवाद्यांचे पुढारी, विभागाच्या कमांडर्ससहीत अन्य सदस्यांविरोधात ऑपरेशन सुरू करण्यास सांगितले आहे. 
 
सुरक्षा दलाच्या "हिट लिस्ट"मध्ये नक्षलवाद्यांच्या दक्षिण बस्तर विभागातील कमांडर रघू, जगरगुंडा परिसरातील नक्षलवाद्यांचा म्होरक्या पापा राव आणि हिडमा यांचा समावेश आहे. 
 
दरम्यान, पीपल्स लिब्रेशन गुरिल्ला आर्मी (PLGA)च्या पहिल्या बटालियनचा कमांडर हिडमा सुकमा हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे म्हटले जात आहे. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बस्तरमध्ये नक्षलवाद्यांच्या वेगवेगळ्या कमिटींमध्ये जवळपास 200-250 नेतृत्व करणारे नक्षलवादी आणि विभाग कमांडर्स सहभाग आहे. जे केवळ सुरक्षा दलांवर हल्ला करण्याची योजना आखणे आणि संपर्क साधणे किंवा देवाणघेवाणीसाठी झारखंड, ओडिशा आणि महाराष्ट्र या राज्यांचा दौरा करतात. 
 
बस्तर पट्ट्यात जवळपास 4000 सशस्त्र नक्षली केडर आणि त्यांचे अंदाजे 10,000-12,000 सहाय्यक आहेत, ज्यांना जन मिलिशिया नावाने ओळखले जाते. 
 
एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांना अटक करण्यात आले होते. मात्र या नक्षलींचे वरिष्ठे नेते सुरक्षा दलाच्या हाती लागले नाहीत. त्यांचे म्होरक्याच घातपातच्या हल्ल्यांचे कटकारस्थान रचतात.
 
दरम्यान, बस्तर क्षेत्रातील नक्षलवाद्यांची कंबर मोडण्यासाठी त्यांना जशासतसे उत्तर देण्यात येणार असल्याचा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानाचा संदर्भ देत अधिका-यानं पुढे असे सांगितले की, सुरक्षा दलांना अतिरिक्त तुकड्यांची जेवढीही गरज भासेल, तेवढी पुरवण्यास सरकार तयार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितले. 
 
नक्षलवाद्यांविरोधात दोन हात करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुरक्षा दलांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचेही आश्वासन दिले. मजबूत गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने 250 नक्षलवाद्याचे लीडर आणि जन मिलिशियाच्या सदस्यांना अटक केली जाऊ शकते, असेही मत संबंधित अधिका-याने मांडले.
 
 
सोमवारी(24 एप्रिल) नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ३०० नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह २५ जवान शहीद झाले असून, सहा जवान अत्यवस्थ आहेत. सुकमा जिल्ह्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध करत, हे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे निर्धारपूर्वक सांगितले.
 
 

Web Title: Release of government's "hit list" to break the waist belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.