सोने कारागिरीतील अल्पवयीन कामगारांची सुटका * गुन्हे शाखेची कारवाई : दोघा जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:40+5:302015-08-26T23:32:40+5:30
पुणे : सोने वितळवून दागिने बनवण्याच्या तसेच दागिन्यांवर नक्षीकाम करण्याच्या कामाला जुंपलेल्या तीन बालकांची सुटका करण्यात आली. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि कामगार आयुक्तालयाच्या अधिका-यांनी संयुक्तपणे छापा टाकून रविवार पेठेत बुधवारी ही कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली.
Next
प णे : सोने वितळवून दागिने बनवण्याच्या तसेच दागिन्यांवर नक्षीकाम करण्याच्या कामाला जुंपलेल्या तीन बालकांची सुटका करण्यात आली. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि कामगार आयुक्तालयाच्या अधिका-यांनी संयुक्तपणे छापा टाकून रविवार पेठेत बुधवारी ही कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली. मोरसलीम जलाल मंडल (वय 33, रा. 743, प्रचित प्लाझा, रविवार पेठ), राजू भवानी दास (वय 31, रा. 85, रास्ता पेठ पॉवर हाऊसजवळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मंडल हा मुळचा पश्चिम बंगालमधील खडसराई येथील राहणार आहे. आरोपींविरुद्ध बालकामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 च्या कलम 3 व 14 तसेच बाल न्याय अधिनियम च्या सन 2000 चे कलम 23 व 16, भादवि 370 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस फौजदार रमेश काळे यांना खब-यामार्फत माहिती मिळाली होती. प्रचित प्लाझामध्ये दुस-या मजल्यावर लहान मुलांकडून सोने वितळवून दागिने बनवून घेण्याचे काम करवून घेतले जात असल्याची माहिती मिळताच निरीक्षक वाघचवरे, सहायक निरीक्षक निता मिसाळ, शितल भालेकर, दिपक सप्रे, रमेश काळे, गणेश जगताप, शशिकांत शिंदे, सुरेश विधाते, रमेश लोहकरे, संदीप होळकर, राजेश उंबरे, नितीन तेलंगे, नितीन लोंढे, सचिन कोकरे, सचिन शिंदे, जयश्री जाधव, ननीता येळे, दमयंती जगदाळे, कविता नलावडे, अनुराधा ठोंबरे, प्रगती नाईकनवरे यांनी छापा टाकला. याठिकाणाहून तीन अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली असून त्यांना संरक्षण गृहामध्ये पाठवण्यात आले आहे. ही कारवाई अतिरीक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.