कर्जबुडव्यांची नावे प्रसिद्ध करा, बँकांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 06:47 AM2018-03-14T06:47:06+5:302018-03-14T06:47:06+5:30
ज्या कर्जदारांनी कर्जांची जाणीवपूर्वक परतफेड केलेली नाही, अशा सर्वांची नावे व छायाचित्रे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करावीत, असे आदेश केंद्रीय अर्थमंत्रालयाने सर्व सरकारी बँकांना दिले आहेत.
Next
नवी दिल्ली : ज्या कर्जदारांनी कर्जांची जाणीवपूर्वक परतफेड केलेली नाही, अशा सर्वांची नावे व छायाचित्रे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करावीत, असे आदेश केंद्रीय अर्थमंत्रालयाने सर्व सरकारी बँकांना दिले आहेत. या कर्जबुडव्यांची नावे व छायाचित्रे प्रसिद्ध करण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची संमती घ्या, असेही अर्थमंत्रालयाने बँकांना सांगितले आहे.
डिसेंबरअखेरीस अशा कर्जदारांची संख्या ९,0६३ असून, त्यांच्याकडील थकीत कर्जाची रक्कम १ लाख १0 हजार ५0 कोटी रुपये इतकी आहे. बँकांनी ५0 कोटींहून अधिक कर्ज घेणाºयांच्या पासपोर्टचे तपशील घेण्याच्या सूचना या आधीच सरकारी बँकांना दिल्या आहेत.