सानियाच्या आत्मचरित्राचे किंग खानच्या हस्ते प्रकाशन

By admin | Published: July 13, 2016 10:08 PM2016-07-13T22:08:22+5:302016-07-13T22:36:12+5:30

भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या आत्मचरित्राचे नुकताच हैदराबाद येथे प्रकाशन झाले. विशेष म्हणजे बॉलिवूड किंग शाहरुख खान याच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन

Release of Sania's autobiography, King Khan | सानियाच्या आत्मचरित्राचे किंग खानच्या हस्ते प्रकाशन

सानियाच्या आत्मचरित्राचे किंग खानच्या हस्ते प्रकाशन

Next

हैदराबाद : भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या आत्मचरित्राचे नुकताच हैदराबाद येथे प्रकाशन झाले. विशेष म्हणजे बॉलिवूड किंग शाहरुख खान याच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन झाल्याने सानियाचा आनंद द्विगुणीत झाला होता. सानियाचे वडिल इमरान मिर्झा यांनी तीच्या 'ऐस अगेन्स्ट आॅड्स' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाची माहिती देताना सांगितले की, मागील आठवड्यात प्रकाशित झालेल्या या पुस्तकामध्ये तीच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि यशाच्या आलेखाचा समावेश आहे. या पुस्तकामध्ये योगदान दिलेल्या इमरान मिर्झा यांनी सांगितले की, 'पुस्तक लिहिण्याचा विचार सानियाचे होते आणि हे पुर्ण करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागला. हे पुस्तक तीचे असून यामध्ये तीच्या आयुष्यातील घडामोडींचा आणि तीने पटकावलेल्या पुरस्कारांच्या माहितीचा समावेश आहे. तीच्या कारकिर्दसहीत जीवनातील प्रत्येक गोष्टीचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Release of Sania's autobiography, King Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.