चणकापूर व पुनद धरणातून पाणी सोडा
By Admin | Published: January 24, 2016 10:20 PM2016-01-24T22:20:50+5:302016-01-24T22:39:22+5:30
जे. पी. गावित यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
जे. पी. गावित यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
कळवण : तालुक्यातील चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात व पुनद धरणातून पुनद नदीतून सुळे डावा कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकर्यांनी आमदार जे.पी. गावित यांच्याकडे केली होती. या मागणीचा पाठपुरावा करीत आमदार गावित यांनी जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांचेकडे पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी यांनी पाणीटंचाई लक्षात घेऊन रविवारी (दि. २४) पाणी सोडण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या असून गावित यांच्या हस्ते पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती माकपचे सेक्र ेटरी हेमंत पाटील यांनी दिली.
कळवण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून भादवण, विसापूर, बिजोरे, चाचेर, पिळकोस, काकाणे, दरेभणगी, मोकभणगी गणोरे, देसराणे, धणेर, अभोणा, बार्डे, कळमथे, पाळे, एकलहरे, कळवण, मानूर, नाकोडे, बेज अशा कित्येक गावातील पाणीपुरवठा योजनाच्या विहिरींनी तळ गाठल्याने योजना कोरड्या झाल्या आहेत, त्यामुळे पिण्याचा पाणी प्रश्न भेडसावत आहे. चणकापूर धरणाचे व पुनद धरणाचे पाणी पाटबंधारे खात्याने तात्काळ सोडून जनतेला पाणी देवून दिलासा द्यावा अशी मागणी या भागातील शेतकरी बांधवांनी केली होती. शेतकर्याच्या मागणीची कैफियत जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागासमोर मांडून आमदार गावित यांनी तत्काळ दोनही धरणाचे पाणी गिरणा व पुनद नदीत सोडण्याची मागणी केली. (वार्ताहर)
(फोटो : आयटीपीएचला २३ कळवण १ नावाने सेव्ह आहे. )