येडशी गुरुकुल गोशाळेच्या पत्राशेडचे लोकार्पण

By admin | Published: June 26, 2015 01:26 AM2015-06-26T01:26:25+5:302015-06-26T01:26:25+5:30

बार्शी:लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊनचा उपक्रम

Release of Yeshashi Gurukul Goshala's Patrashed | येडशी गुरुकुल गोशाळेच्या पत्राशेडचे लोकार्पण

येडशी गुरुकुल गोशाळेच्या पत्राशेडचे लोकार्पण

Next
र्शी:लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊनचा उपक्रम
बार्शी- लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊनच्यावतीने येडशी अभयारण्यातील वेदश्री गुरुकुल गोशाळेत बसवलेल्या भव्य पत्र्याच्या शेडचे लोकार्पण प्रांतपाल विजयकुमार राठी यांच्या हस्ते करण्यात आले़
यावेळी गुरुकुलचे संस्थापक आचार्य सुभाषचंद्र, नगराध्यक्ष रमेश पाटील, क्लबचे रिजनल चेअरमन अतुल सोनिग्रा, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रकाश फुरडे, सचिव डॉ़ शरद पाटील, इचलकरंजी क्लबचे अध्यक्ष जाजू, नाना कदम, गुरुकुलचे संचालक डी. के. कुलकर्णी, कांबळे, तोष्णीवाल आदी उपस्थित होते़
यावेळी नगराध्यक्ष पाटील म्हणाले, सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून लायन्स क्लबचे कार्य सुरू आहे़ समाजातील खर्‍या गरजवंतांचा शोध घेऊन त्यांना सहकार्य करण्यासाठी लायन्सचे पदाधिकारी अग्रेसर असतात़ गोमातेमध्ये आपण देवाचे रूप पाहतो़ त्यांना निवारा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने लायन्सने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे़ आचार्य सुभाषचंद्र्र म्हणाले, संस्काराने माणूस शुद्ध होतो़ येथील गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांवर आचार, विचार व संस्कारांची रुजणूक करण्यात येते़ मागील ३० वर्षांपासून येथे हे कार्य सुरू आहे़ गोशाळेबाबत बोलताना ते म्हणाले, गोमातेला आपल्या जीवनात खूप महत्त्व असून त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन होणे गरजेचे असल्याचे सांगत लायन्स क्लबने पुढाकार घेऊन येथील गोशाळेला नवीन पत्राशेड करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले़ विभागीय सभापती अतुल सोनिग्रा यांनी लायन्सच्या उपक्रमाचे कौतुक करून क्लबमध्ये एकोपा व खेळीमेळीचे वातावरण असल्याने हे शक्य झाल्याचे सांगितले़ लायन्सचे प्रांतपाल विजयकुमार राठी म्हणाले, बार्शीची लायन्स टीम एक व्हिजन डोळ्यांसमोर ठेवून कार्य करते़ समाजाची नेमकी गरज ओळखून अशांना मदत करण्याचे काम सातत्याने सुरू आहे़ हा क्लब म्हणजे आमच्या प्रांतातील क्रियाशील क्लब म्हणून ओळखला जातो़ त्यामुळेच या क्लबला वर्षातून तीनवेळा भेट दिली़ क्लबने सामाजिक कार्य अशाच प्रकारे सुरू ठेवावे, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली़ प्रास्ताविकात अध्यक्ष प्रकाश फुरडे यांनी वर्षभरातील कामाचा आढावा घेत क्लबमधील सर्व सहकार्‍यांच्या तसेच लायनेस क्लबच्या सहकार्यामुळेच हे मोठे काम आम्ही उभारू शकलो, अशी भावना व्यक्त केली़ डी़के़कुलकर्णी, नाना कदम यांनीही यावेळी समयोचित विचार व्यक्त केले़ याप्रसंगी क्लब मेंबर उमेश कोल्हे यांनी गोशाळेला मोफत सोलर लॅम्प देण्याची घोषणा केली़
यावेळी लायन्स क्लबचे आनंद सोमाणी, अमर काळे, डॉ़ सागर हाजगुडे, डॉ़ योगेश कुलकर्णी, प्रदीप जाधव, राहुल माढेकर, जितेंद्र माढेकर, लायनेस क्लबच्या अध्यक्षा शिल्पा कुलकर्णी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला़ सूत्रसंचालन अमित कांकरिया व अमर काळे यांनी केले़ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिजनल चेअरमन अतुल सोनिग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली शंभुलाल भानुशाली,अमित इंगोले, प्रवीण कसपटे, उमेश चौहान, सुमित जैन, अमोल गुंडेवार, गणेश भंडारी व शीतल गांधी आदींनी परिश्रम घेतले़

Web Title: Release of Yeshashi Gurukul Goshala's Patrashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.