Reliance AGM 2020: कोरोना लसीवर नीता अंबानींची मोठी घोषणा; इतिहासात पहिल्यांदाच भाषण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 06:29 PM2020-07-15T18:29:57+5:302020-07-15T21:58:14+5:30
Reliance AGM 2020: रिलायन्सच्या इतिहासात पहिल्यांदाच नीता अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले.
नवी दिल्ली : Nita Ambani speech Reliance AGM 2020: रिलायन्सने भारतात 5 जी तंत्रज्ञानाची नांदी घातली असून हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी गुगलसोबत मिळून सॉफ्टवेअर बनविणार असल्याची आज घोषणा केली. यामुळे रिलायन्स जिओ सामान्यांसाठी परवडणारे 5G स्मार्टफोन लाँच करण्याती शक्यता आहे. याचबरोबर नीता अंबानी यांनी कोरोना व्हॅक्सिनबाबत मोठी घोषणा केली आहे.
रिलायन्सच्या इतिहासात पहिल्यांदाच नीता अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी सांगितले की, कोरोना महामारीसोबत लढाई अजून बाकी आहे. या लढाईत रिलायन्स फाऊंडेशन सरकार आणि स्थानिक महापालिकांसोबत मिळून काम करत आहे.
रिलायन्स फाऊंडेशन स्थानिक प्रशासनासोबत मिळून कोरोना चाचण्यांसाठी मोठ्या वेगाने काम करत आहे. या कामाला रिलायन्सच जिओच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे खूप मदत मिळाली आहे. नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत. (Reliance Jio)
I can assure you as soon as a Corona vaccine becomes available, we will volunteer by using the same digital distribution & supply chain to ensure that the vaccine reaches every nook & corner of our country: Nita Ambani, Reliance Foundation Chairperson and founder https://t.co/rMZY75VAS9
— ANI (@ANI) July 15, 2020
कोरोना लसीवर बोलताना त्या म्हणाल्या की, आम्ही लोकांना विश्वास देऊ इच्छितो की जेव्हा कोरोनावरील लस (Corona Vaccine) तयार होईल तेव्हा देशातील प्रत्येक बाधित व्यक्तीपर्यंत हे औषध पोहोचविण्याची जबाबदारी आमची असणार आहे. यासाठी रिलायन्स फाऊंडेशन जिओच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्टरचा वापर करणार आहे. तसेच ही लस लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुरवठा साखळी मजबूत बनविण्यात येणार आहे. यामुळे अधिकाधिक लोक या महामारीपासून वाचू शकतील.
अन्य महत्वाच्या बातम्या...
कुठेय लॉकडाऊन; कुठेय मंदी! भारतातल्या सर्वांत महागड्या फ्लॅटची खरेदी; किंमत पाहून हादराल
आशेचा किरण! कोरोना लसीवर उद्या होऊ शकते 'पॉझिटिव्ह' घोषणा; पुण्याच्या सीरम इन्सिट्युटचाही मोठा वाटा
Breaking : बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर
गेहलोत यांची सचिन पायलटांवर वैयक्तीक टीका; काँग्रेस नेतृत्व झाले नाराज
...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा
...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल
सोने स्वस्त झाले! झटपट जाणून घ्या आजचे दर