Reliance चा अटकेपार डंका; बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड, Appleचे स्थान धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 11:18 AM2020-08-06T11:18:10+5:302020-08-06T11:19:36+5:30
फ्युचरब्रँडने 2020 च्या या यादीमध्ये सर्वात मोठी उडी ही दुसऱ्या नंबरसाठी घेतली गेली आहे. रिलायन्स सर्वबाजुंनी ताकदवर होत चालली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीने एक मोठे यश मिळविले आहे. लॉकडाऊन काळात अब्जावधीची परकीय गुंतवणूक मिळविणाऱ्या रिलायन्सने ‘फ्युचरब्रँड इंडेक्स 2020’ मध्ये थेट दुसरा क्रमांक पटकाविला आहे. हे यश कंपनीला अशावेळी मिळाले आहे जेव्हा बाजारमुल्य 14 लाख कोटीवर जाऊन पोहोचले आहे. तसेच कंपनी कर्जमुक्तही झाली आहे. तसेच रिलायन्सचा शेअर 2200 रुपयांवर आहे.
हा इंडेक्स जगातील सर्वात मोठे ब्रँडची माहिती देतो. यामुळे रिलायन्स केवळ भारताचाच नाही तर जगातील दुसरा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. रिलायन्सच्या पुढे आयफोन बनविणारी कंपनी अॅपल आहे. रिलायंस इंडस्ट्रीजमध्ये होत असलेल्या गुंतवणुकीच्या वेगावरून असे दिसते की, काही महिन्यांतर रिलायन्स अॅपललाही मागे टाकून जगातील पहिला सर्वात मोठा ब्रँड बनणार आहे.
फ्युचरब्रँडने 2020 च्या या यादीमध्ये सर्वात मोठी उडी ही दुसऱ्या नंबरसाठी घेतली गेली आहे. रिलायन्स सर्वबाजुंनी ताकदवर होत चालली आहे. ही भारतातील सर्वाधिक फायद्यात असलेली कंपनी आहे. कंपनी नैतिकतेने काम करते. यामुळे लोकांचा कंपनीवर भावनिक विश्वास वाढत चालला आहे, असे फ्युचरब्रँडने म्हटले आहे.
रिलायन्सच्या या यशाचे श्रेय मुकेश अंबानींना दिले जावे. त्यांनी कंपनीला नवीन ओळख दिली आहे. आज कंपनी ऊर्जा, पेट्रोलिअम, कापड उद्योग, नैसर्गिक संसाधने, रिटेल आणि दूरसंचारसारख्या क्षेत्रात काम करत आहे. गुगल आणि फेसबुकनेही यामध्ये भागीदारी खरेदी केली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
यादीत आणखी कोण कोण
या यादीमध्ये अॅपल आणि रिलायन्सनंतर सॅमसंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या एनवीडिया, मोताई पाचव्या, नाईकी सहाव्या, मायक्रोसॉफ्ट सातव्या, एएसएमएल आठव्या, पेपल नवव्या आणि नेटफ्लिक्स दहाव्या स्थानावर आहे. फ्युचरब्रँड गेल्या सहा वर्षांपासून ही यादी जाहीर करत आहे.
अन्य़ महत्वाच्या बातम्या...
Unlock: लॉकडाऊनमधील EMI दिलासा संपणार? RBI थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार
Video: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित
सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...
कोविड रुग्णालयाला भीषण आग; गुजरातमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू
आजचे राशीभविष्य - 6 ऑगस्ट 2020; वृश्चिक, कर्क राशीला मतभेद, नुकसानीचा धोका
राफेलनंतर शक्तीशाली, सशस्त्र ड्रोन मिळणार; अमेरिका 450 किलोंचे बॉम्बही देणार
Xiaomi ला सरकारचा जोरदार दणका; मोबाईलमधील ब्राऊझर बॅन केला
राजकारण बाजुला ठेवा, वडिलांना हे विचारा! आदित्य ठाकरेंवर कंगनाचा प्रश्नांचा भडीमार
लक्झरी कार 'Porsch 911' घेण्यासाठी पठ्ठ्याने असे काही केले; थेट जेलमध्ये रवानगी झाली
शाओमीचा स्वस्तातला Redmi 9A स्मार्टफोन येणार; 6000 पेक्षा कमी किंमत असणार