'ट्राय'कडून रिलायन्स जिओला क्लीनचिट

By admin | Published: February 2, 2017 09:33 PM2017-02-02T21:33:54+5:302017-02-02T21:34:24+5:30

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (ट्राय) रिलायन्स जिओला क्लीनचिट देण्यात आली आहे.

Reliance Genoa Cleanchit from 'TRAI' | 'ट्राय'कडून रिलायन्स जिओला क्लीनचिट

'ट्राय'कडून रिलायन्स जिओला क्लीनचिट

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 2 - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (ट्राय) रिलायन्स जिओला क्लीनचिट देण्यात आली आहे. जिओची वेलकम ऑफर आणि हॅप्पी न्यू इअर ऑफर ही ट्रायच्या नियमांनुसारच आहे आणि यामुळे ट्रायच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन होत नसल्याचं ट्रायने म्हटलं आहे.  

‘ट्राय’ने रिलायन्स जिओला मोफत सेवा चालू ठेवण्यास परवानगी देऊन नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप इतर टेलिकॉम कंपन्यांकडून करण्यात आला होता. ट्राय याबाबत लवकरच एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांना कल्पना देणार आहे.या कंपन्यांनी जिओची वेलकम ऑफर 90 दिवसांनंतरही सुरू करण्याला आव्हान दिलं होतं. यापुर्वी अॅटर्नी जनरल यांनीही रिलायन्स जिओकडून कोणत्याही नियमांचं उल्लंघन होत नसल्याचं म्हटलं होतं. 

Web Title: Reliance Genoa Cleanchit from 'TRAI'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.