मुकेश अंबानी यांनी तिरुपती बालाजी मंदिरात घेतलं दर्शन, दान केले दीड कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 05:55 PM2022-09-16T17:55:46+5:302022-09-16T17:56:12+5:30
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (RIL) चेअरमन मुकेश अंबानी यांना भगवान वेंकटेश्वराबद्दल अपार श्रद्धा आहे.
मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी तिरूपती बालाजी मंदिरात दीड कोटी रुपये दान केले. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (RIL) चेअरमन मुकेश अंबानी यांना भगवान वेंकटेश्वराबद्दल अपार श्रद्धा आहे. तिरुमलाजवळील टेकडीवर वसलेल्या भगवान वेंकटेश्वराच्या या प्राचीन मंदिरात मुकेश अंबानी यांच्यासह अन्य काही लोकांनीही दर्शन घेतलं. यामध्ये एन्कोर हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट आणि रिलायन्सचे अन्य अधिकारी होते. मंदिराच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
मंदिराच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी शुक्रवारी पहाटे मंदिरात पोहोचले. दर्शन घेतल्यानंतर अंबानी यांनी तिरुमाला तिरुपती देवस्थानमचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी (टीटीडी) ए.के. वेंकट धर्मा रेड्डी यांच्याकडे दीड कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यानंतर त्यांनी तिरुमला टेकडीवर असलेल्या एका गेस्टहाऊसमध्येही काही काळ घालवला.
Shri Mukesh Ambani offered prayers at Tirumala Tirupati Devasthanam, #AndhraPradesh along with Smt Radhika Merchant. May Lord Venkateswara bless them with good health and long life.#MukeshAmbanipic.twitter.com/wx2wtMCRIx
— Parimal Nathwani (@mpparimal) September 16, 2022
पूजाही केली
गेस्ट हाऊसमध्ये काही वेळ घालवल्यानंतर त्यांनी पूजा अर्चाही केली, अशी माहिती अधिकाऱ्याकडून देण्यात आली. मुकेश अंबानी, राधिका मर्चंट आणि इतरांनी गर्भगृहात पुजार्यांनी वैदिक मंत्रोच्चारात सूर्योदयाच्या वेळी केलेल्या अभिषेकममध्येही भाग घेतला. अंबानींनी मंदिरातील हत्तींनाही अन्न दिल्याची माहिती देण्यात आली.