रिलायन्स जिओ इंटरनेट स्पीडमध्येही नंबर वन - ट्राय

By Admin | Published: April 4, 2017 01:42 PM2017-04-04T13:42:57+5:302017-04-04T13:42:57+5:30

इंटरनेट स्पीडच्याबाबतीत रिलायन्स जिओ पहिल्या क्रमांकावर

Reliance Jio Internet Speed ​​also includes number one - TRAI | रिलायन्स जिओ इंटरनेट स्पीडमध्येही नंबर वन - ट्राय

रिलायन्स जिओ इंटरनेट स्पीडमध्येही नंबर वन - ट्राय

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - इंटरनेट स्पीडच्याबाबतीत रिलायन्स जिओने इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांना खूप मागे टाकलं आहे. याबाबतीत रिलायन्स जिओ पहिल्या क्रमांकावर असल्याचं दूरसंचार नियामक म्हणजे ट्रायने म्हटलं आहे.  ट्रायच्या डेटानुसार इंटरनेट स्पीडच्याबाबतीत रिलायन्स जिओ पहिल्या क्रमांकावर आहे. 
 
रिलायन्स जिओचा डेटा डाऊनलोड स्पीड इतर प्रतिस्पर्धी कंपन्या आयडिया सेल्यूलर आणि एअरटेलपेक्षा दुप्पट झाला असल्याचं ट्रायने म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात जिओ नेटवर्क सर्वात वेगवान ठरलं आहे. जिओ नेटवर्कचा फेब्रुवारी महिन्यातील इंटरनेट स्पीड 16.48 एमबीपीएस होता. पण जानेवारीच्या तुलनेत हा स्पीड कमी झाला आहे. जानेवारीत जिओचा स्पीड 17.42 mbps एमबीपीएस होता. 
 
जिओचे प्रतिस्पर्धी आयडिया सेल्युलर 8.33 एमबीपीएस दुसऱ्या स्थानावर आणि एअरटेल 7.66 एमबीपीएस तिसऱ्या स्थानावर आहे. तर वोडाफोनचा स्पीड 5.66 एमबीपीएस आहे. तर बीएसएनएलचा 2.89 एमबीपीएस आहे. ट्रायच्या डेटानुसार, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सरासरी डाऊनलोड स्पीड रिलायन्स कम्युनिकेशन्ससाठी 2.67 एमबीपीएस तर टाटा डोकोमोसाठी 2.67 एमबीपीएस तर एअरसेलसाठी 2.01 एमबीपीएस आहे. इतर नेटवर्कसाठी सरासरी डाऊनलोड स्पीड उपलब्ध नाही.
 
यापुर्वी एअरटेलने सर्वात वेगवान इंटरनेट आमचं असल्याचा दावा एअरटेलने केला होता. 
 
 

Web Title: Reliance Jio Internet Speed ​​also includes number one - TRAI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.