रिलायन्स Jioनं केला परवाना मिळवताना झोल
By admin | Published: March 8, 2017 11:16 PM2017-03-08T23:16:31+5:302017-03-08T23:49:46+5:30
रिलायन्स जिओबाबत सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - दूरसंचार कंपनी रिलायन्स जियोने नवनवे रेकॉर्ड केले असून, आतापर्यंत या कंपनीने 10 कोटी ग्राहक जोडले आहेत. हे जागतिक रेकॉर्ड असल्याचा दावा कंपनीने केला आहे. अल्पावधीतच ग्राहकांमध्ये लोकप्रिय झालेल्या दूरसंपर्क कंपनी रिलायन्स जिओबाबत सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एका ऑडिट रिपोर्टनुसार, गेल्या 3 वर्षांच्या कालावधीत रिलायन्सनं एकूण उत्पन्नापैकी 63 कोटी रुपये कमी दाखविले आहेत. या तीन वर्षांच्या कालावधीत रिलायन्स कंपनीने परकीय विनिमय दरातून झालेला फायदा उत्पन्नात दाखविला नाही. त्यानंतर ऑडिट महानिदेशालया(डाक आणि दूरसंचार)ने कंपनीने तीन वर्षांच्या कालावधीत परवाना शुल्क कमी भरल्याची माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. पाच पानांचा हा ऑडिट रिपोर्ट 22 फेब्रुवारी 2017ला समोर आला.
या ऑडिट रिपोर्टनुसार, 2012-13 आर्थिक वर्षात 1.29 कोटी रुपयांचा कंपनीला फायदा झाला होता. तर 2013-14 या आर्थिक वर्षात 41.67 कोटींचं उत्पन्नाच्या स्वरूपात फायदा रिलायन्सला मिळाला होता. 2014-15मध्ये 20.18 कोटी रुपयांचा परकीय चलनात रिलायन्सला फायदा झाला आहे. तसेच लायसन्स शुल्क मिळवून एकूण 63.77 कोटी रुपये कमी दाखवण्यात आल्याची माहिती या ऑडिट रिपोर्टमधून उघड झाली आहे. फायद्याच्या स्वरूपात रिलायन्स जिओनं सरकारला परवाना शुल्काच्या माध्यमातून महसूल दिला नाही.