... तर महाराष्ट्रासह सात राज्यातील जिओ ग्राहकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 01:16 PM2018-12-24T13:16:07+5:302018-12-24T13:51:45+5:30

रिलायन्स जिओ इन्फोकॉमने जर रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून स्पेक्ट्रम खरेदी केली नाही तर दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह सात राज्यांतील जिओच्या ग्राहकांना फटका बसू शकतो.

reliance jio users may face trouble if rcom deal fails | ... तर महाराष्ट्रासह सात राज्यातील जिओ ग्राहकांना फटका

... तर महाराष्ट्रासह सात राज्यातील जिओ ग्राहकांना फटका

Next
ठळक मुद्दे रिलायन्स जिओ इन्फोकॉमने जर रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून स्पेक्ट्रम खरेदी केली नाही तर दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह सात राज्यांतील जिओच्या ग्राहकांना फटका बसू शकतो.जिओची सेवा मिळविण्यासाठी या ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतोआंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूसह काही राज्यात 800 मेगाहर्ट्ज बँड पाच युनिट्सवर अवलंबून आहे.

कोलकाता - रिलायन्स जिओ इन्फोकॉमने जर रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून स्पेक्ट्रम खरेदी केली नाही तर दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह सात राज्यांतील जिओच्या ग्राहकांना फटका बसू शकतो. जिओची सेवा मिळविण्यासाठी या ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती टेलिकॉम सेक्टरमधील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूसह काही राज्यात 800 मेगाहर्ट्ज बँड पाच युनिट्सवर अवलंबून आहे. स्पेक्ट्रम ब्लॉकसाठी जिओ आरकॉमवर अवलंबून आहे. हा बँड 4 जी एलटीई सेवेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. यातून प्रत्येक सर्कलमध्ये जिओकडे 800 मेगाहर्ट्झ बँडमध्ये 4जी एअरवेव्सच्या 3.8 युनिट्स आहेत. या बँडमध्ये एलटीई कव्हरेजसाठी आरकॉमच्या स्पेक्ट्रमवर अवलंबून आहे.

रोहन धमीजा यांनी दिलेल्या माहितीनुसार,  स्पेक्ट्रम ट्रेडिंग डील लवकर स्पष्ट होणे जिओसाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण या डीलनंतर जिओला आरकॉम 4जी स्पेक्ट्रम मिळेल. ही डील झाल्यास जिओला 800 मेगाहर्ट्ज बँडमध्ये कंटिगुअस ब्लॉक्स बनवण्यासाठी मदत मिळेल.  2017 मध्ये स्पेक्ट्रम ट्रेडिंग करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या कराराला मंजुरी मिळाल्यानंतर आरकॉम 4जी एअरवेव्सची 112.4 युनिट्स जिओला विकण्यात आली होती. यातून 800 मेगाहर्ट्ज बँड एलटीई स्पेक्ट्रमचाही समावेश होता. 

आरकॉनने सिस्टेमा श्याम टेलिसर्विसेसजकडून खरेदी केली होती. आरकॉमवर 46,000 कोटींचे कर्ज आहे. हा स्पेक्ट्रम विकल्यानंतर आरकॉमला 18,000 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी मदत होईल. आरकॉम आणि जिओ या दोन्हींसाठी ही डील अत्यंत महत्त्वाची आहे. जर हा स्पेक्ट्रम मिळाला नाही तर मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, ओडिशा, आसामसह पूर्वीकडील राज्यातील जिओ ग्राहकांच्या सेवेला फटका बसण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: reliance jio users may face trouble if rcom deal fails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.