अंबानींच्या हाती येणार 3,675 कोटींचा नवा चेक; Reliance Retail ला मिळाला तिसरा गुंतवणूकदार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 09:48 AM2020-09-30T09:48:45+5:302020-09-30T09:50:23+5:30

रिलायन्स रिटेलमध्ये झालेली ही तिसरी गुंतवणूक आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच जगातील दिग्गज टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्वर लेकने 7500 कोटी रुपये गुंतविण्याची घोषणा केली होती.

Reliance Retail gets third investor GENERAL ATLANTIC; will invest 3,675 crore | अंबानींच्या हाती येणार 3,675 कोटींचा नवा चेक; Reliance Retail ला मिळाला तिसरा गुंतवणूकदार

अंबानींच्या हाती येणार 3,675 कोटींचा नवा चेक; Reliance Retail ला मिळाला तिसरा गुंतवणूकदार

Next

नवी दिल्ली : कोरोनाची महामारी डिस्नेसारख्या बलाढ्य कंपन्यांसाठी मोठे संकट बनून उभी ठाकलेली असली तरीही भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्ससाठी खूपच फायद्याची ठरली आहे. मुकेश अंबानींची Reliance Retail Ventures Limited (RRVL) रिटेल कंपनीला तिसरा गुंतवणूकदार मिळाला आहे. इक्विटी फर्म GENERAL ATLANTIC ने रिलायन्समध्ये 0.84 हिस्सा 3,675 कोटींना विकत घेण्याचे ठरविले आहे. 


यामुळे रिलायन्सला आणखी एक मोठी गुंतवणूक मिळाली असून रिलायन्स रिटेलची प्री मनी इक्विटी व्हॅल्यू 4.285 लाख कोटी रुपये झाली आहे. महत्वाचे म्हणजे जनरल अटलांटिकची रिलायन्समधील ही दुसरी गुंतवणूक आहे. या कंपनीने रिलायन्स जिओमध्ये 6,598.38 कोटी रुपये गुंतविण्याची घोषणा केली होती. 


रिलायन्स रिटेलमध्ये झालेली ही तिसरी गुंतवणूक आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच जगातील दिग्गज टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्वर लेकने 7500 कोटी रुपये गुंतविण्याची घोषणा केली होती. या बदल्यात कंपनीला रिलायन्स रिटेलची 1.75 टक्के हिस्सेदारी मिळणार आहे. तसेच केकेआरने 1.75 टक्के हिस्सेदारी खरेदी करत 5550 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रिलायन्सचे देशभरात 12000 स्टोअर्स आहेत. 


या नव्या व्यवहारावर मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जनरल अटलांटिकसोबतचे नाते पुढे गेल्याने खूश आहे. आम्ही व्यापारी आणि ग्राहकांना समानतेने सशक्त बनविण्यासाठी काम करत आहोत. 


रिलायन्सचा विस्तार
 रिलायन्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रामध्ये मोठा विस्तार करू लागली असून ऑनलाईन फार्मसी कंपनी नेटमेड्स खिशात घातल्यानंतर आता रिटेल क्षेत्रातील फ्युचर ग्रुपची सर्वात मोठी कंपनी बिग बझार, फूड बझारवरही 'कब्जा' केला आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने  फ्युचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल बिझनेस तसेच लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग बिझनेस खरेदी केला आहे. 
हा व्यवहार लवकरच पूर्णत्वास येणार असून 24713 कोटी रुपयांना ही डील झाली आहे. यामुळे बिग बझार, फूड बझार, ई-झोन आणि अन्य रिटेल व्यवसाय रिलायन्सच्या ताब्यात आले आहेत. या डीलमुळे रिलायन्स रिटेल क्षेत्रातील बेताज बादशाह बनली आहे. हा व्यवहार झाल्यावर फ्यूचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल व्यवसाय रिलायन्स रिटेल अँड फॅशन लाईफस्टाईल लिमिटेड (RRFLL) अंतर्गत येणार आहे. RRFLL  ही RRVLच्या पूर्ण मालकीची कंपनी आहे. 


Netmeds ची खरेदी
रिलायन्स इंडस्ट्रीची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने ऑनलाईन फार्मसी नेटमेड्समध्ये (Netmeds) 60 टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. रिलायन्सने ही डील 620 कोटींमध्ये केली असून मंगळवारी याची घोषणा केली. RRVL ने ही हिस्सेदारी व्हिटेलिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडमध्ये खरेदी केली आहे. या कंपनीच्या सहाय्यक कंपन्यांना नेटमेड्स नावाने ओळखले जाते. रिलायन्सने अन्य कंपन्या त्रिसारा हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, नेटमेड्स मार्केटप्लेस लिमिटेड आणि दाधा फार्मा डिस्ट्रिब्यूशन प्राइवेट लिमिटेडमध्ये 100 टक्के मालकी खरेदी केली आहे. 

Web Title: Reliance Retail gets third investor GENERAL ATLANTIC; will invest 3,675 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.