रिलायन्स जिओ Lyf स्मार्टफोन फुटला
By admin | Published: November 7, 2016 06:11 PM2016-11-07T18:11:42+5:302016-11-07T18:20:40+5:30
रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यापासूनच चर्चेत आहे. कधी अनलिमिटेड इंटरनेट तर कधी कमी 4जी स्पीड मिळतो म्हणून जिओच्या बातम्या सातत्याने येत आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 07 - रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यापासूनच चर्चेत आहे. कधी अनलिमिटेड इंटरनेट तर कधी कमी 4जी स्पीड मिळतो म्हणून जिओच्या बातम्या सातत्याने येत आहेत. मात्र, यावेळी Lyf स्मार्टफोन फुटल्याची बातमी आली असून त्यामुळे कंपनी चर्चेत आहे.
मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर तन्विर सादिक नावाच्या एका व्यक्तीने जळालेल्या Lyf स्मार्टफोनचे फोटो शेअर केले आहेत तसेच माझा परिवार आज थोडक्यात बचावला असं ट्वीट त्यांनी केलं आहे. मात्र, या स्मार्टफोनच्या मॉडेलनंबरबाबत कोणतीही माहिती सादिकने दिलेली नाही.
सादिकच्या ट्विटनंतर Lyf स्मार्टफोनचं ट्विटर हॅंडल सांभाळणा-यांकडून सादिकला या घटनेबाबत आणखी माहितीची विचारणा करण्यात आली आहे. घटनेची गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करणार असल्याचंही कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
(BSNL पण देणार फ्री व्हॉइस सेवा - 'जिओ'ला देणार टक्कर)My family had a narrow escape today after @reliancejio 's @Reliance_LYF phone exploded & burst into flames. pic.twitter.com/NggIGMc8Zw
— Tanvir Sadiq (@tanvirsadiq) November 6, 2016
यापुर्वी सॅमसंग कंपनीचा Galaxy Note 7 फुटल्यानंतर कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.