रिलायन्सची ४ जी सेवा, अवघ्या ९३ रुपयांत १० जीबी डेटा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2016 05:05 PM2016-06-28T17:05:36+5:302016-06-28T17:12:35+5:30
रिलायन्स कम्युनिकेशन आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर घेऊन येत आहे. रिलायन्स जिओ नेटवर्कची ४ जी सेवा वापरणा-या रिलायन्सच्या सीडीएमए
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - रिलायन्स कम्युनिकेशन आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर घेऊन येत आहे.
रिलायन्स जिओ नेटवर्कची ४ जी सेवा वापरणा-या रिलायन्सच्या सीडीएमए ग्राहकांना या सेवेचा फायदा होणार आहे. अवघ्या ९३ रुपयांत १० जीबी इंटरनेट डेटा रिलायन्सच्या ग्राहकांना आता वापरता येणार आहे. ही सेवा येत्या आठवड्यापासून ठराविक सर्कलमध्ये सुरु करण्यात येणार आहे.
आठ दशलक्ष रिलायन्स कम्युनिकेशनच्या सीडीएमए ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. जवळपास ९० टक्के ग्राहक ४ जी सेवा अपग्रेड करतील अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.
मुंबई, दिल्ली, पंजाब, कोलकाता, गुजरात, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, उत्तर आणि पश्चिम उत्तर प्रदेश, ओडिसा, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये सध्या रिलायन्स आपली ४ जी सेवा सुरु करणार आहे. त्यानंतर जुलैमध्ये आणखी सहा सर्कलमध्ये आपली सेवा कार्यरत करणार आहे. यामध्ये तामीळनाडू, केरळ, कर्नाटक आणि राजस्थानचा समावेश आहे.