सामान्यांना दिलासा! PNG-CNG च्या किमती कमी होणार; केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 09:57 PM2023-04-06T21:57:13+5:302023-04-06T21:57:22+5:30

पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नैसर्गिक वायूच्या किमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी देण्यात आली आहे.

Relief for the common people! PNG-CNG prices to drop; Approval given by the Union Cabinet | सामान्यांना दिलासा! PNG-CNG च्या किमती कमी होणार; केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

सामान्यांना दिलासा! PNG-CNG च्या किमती कमी होणार; केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

googlenewsNext

नवी दिल्ली: पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नैसर्गिक वायूच्या किमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या नवीन फॉर्म्युल्यानुसार, घरगुती नैसर्गिक वायूची किंमत आता भारतीय क्रूड बास्केटच्या किंमतीच्या आधारावर निश्चित केली जाईल. तर, आत्तापर्यंत देशांतर्गत नैसर्गिक वायूची किंमत जगातील चार प्रमुख गॅस ट्रेडिंग हब - हेन्री हब, अल्बेना, नॅशनल बॅलन्सिंग पॉइंट (यूके) आणि रशियन गॅसच्या किमतीच्या आधारे निश्चित केली जात होती. या निर्णयामुळे येत्या दोन दिवसांत म्हणजेच शनिवारपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होतील. PNG ची किंमत 10% कमी होईल, तर सीएनजीच्या किंमती सुमारे 6 ते 9% कमी होतील.

बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्यामध्ये पेट्रोलियम मंत्रालयाशी संबंधित एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नवीन सूत्राला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

काय असेल नवीन फॉर्म्युला?
नवीन फॉर्म्युल्यानुसार गॅसची किंमत दर महिन्याला निश्चित केली जाणार आहे. तर जुन्या फॉर्म्युल्यानुसार दर सहा महिन्यांनी गॅसची किंमत ठरत होती. याशिवाय, नवीन सूत्रानुसार गेल्या एक महिन्यातील भारतीय क्रूड बास्केटची किंमत घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतीचा आधार म्हणून घेतली जाईल. तत्पूर्वी, जुन्या सूत्रानुसार जगातील चारही गॅस ट्रेडिंग केंद्रांच्या मागील एका वर्षाच्या किंमतीची सरासरी घेतली जात होती आणि नंतर ती तीन महिन्यांच्या अंतराने लागू केली जात होती.

नवीन फॉर्म्युला लागू झाल्यानंतर पीएनजी आणि सीएनजी स्वस्त होणार असल्याचा सरकारचा दावा आहे. यामुळे घरगुती ग्राहकांना अधिक स्थिर दराने गॅस मिळेल. याशिवाय खते बनवणाऱ्या कंपन्यांना स्वस्तात गॅस मिळणार असून, त्यामुळे खतावरील अनुदान कमी होणार आहे. नवीन फॉर्म्युला लागू झाल्याने ऊर्जा क्षेत्राला स्वस्त गॅस मिळणार आहे. 

Web Title: Relief for the common people! PNG-CNG prices to drop; Approval given by the Union Cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.