मानहानीप्रकरणी केजरींना दिलासा
By admin | Published: April 18, 2015 12:21 AM2015-04-18T00:21:16+5:302015-04-18T00:21:16+5:30
मानहानी खटल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना दिलासा
नवी दिल्ली : मानहानी खटल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना दिलासा देत,सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांच्याविरुद्धच्या संबधित दोन प्रकरणांच्या सुनावणीस स्थगिती दिली. मानहानी संबंधित कायद्यांच्या दंडात्मक तरतुदींच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या केजरीवालांच्या याचिकेवर न्यायालयाने केंद्राला नोटीसही बजावली.
न्या. दीपक मिश्रा व न्या. प्रफुल्ल सी. पंत यांच्या खंडपीठाने केजरीवालांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर केंद्र सरकार व अन्य संबंधित पक्षांना नोटीस जारी केली.
सहा आठवड्यांच्या आत याचे उत्तर देण्याचे न्यायालयाने बजावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ८ जुलैला होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे माजी राजकीय सचिव पवन खेडा यांनी केजरीवालांविरुद्ध दाखल केलेल्या मानहानी प्रकरणांच्या सुनावणीवर न्यायालयाने स्थगिती आणली.