आधार कार्ड नसलेल्यांना दिलासा, पॅनकार्डाद्वारे भरता येणार रिटर्न

By Admin | Published: June 9, 2017 05:02 PM2017-06-09T17:02:53+5:302017-06-09T17:19:32+5:30

पॅन कार्ड आघारशी जोडण्यात्या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे

Relief for non-Aadhaar card, PAN card return returns | आधार कार्ड नसलेल्यांना दिलासा, पॅनकार्डाद्वारे भरता येणार रिटर्न

आधार कार्ड नसलेल्यांना दिलासा, पॅनकार्डाद्वारे भरता येणार रिटर्न

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 9 - पॅन कार्ड आधारशी जोडण्याच्या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. आधार कार्ड नसल्यास पॅन कार्डचा वापर करुन इन्कम टॅक्स रिटर्न भरता येईल असेही यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच घटनापीठाचा निकाल येईपर्यंत आधार-पॅन जोडणीवरील स्थगिती कायम राहणार आहे.
केंद्र सरकारने बोगस पॅन कार्डद्वारे होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी आधार-पॅन जोडण्याचा कायदा अंमलात आणला होता. सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. आधार कार्ड ऐच्छिक असल्याची भूमिका घेणारं सरकार अचानक एवढा मोठा निर्णय कसं घेऊ शकतं, असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला होता. त्यावरील सुनावणीदरम्यान, सुप्रीम कोर्टानं आधार-पॅन जोडणीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९अअ हा कायदा संमत करण्यात आला आहे. या कायद्यानुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधार देणं सक्तीचं करण्यात आले आहे. बोगस कागदपत्राच्या आदारे पॅन कार्ड तयार केली जातात. त्या आधारे बोगस कंपन्या स्थापन करून गैरव्यवहार होतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्रानं हा तोडगा काढला. त्यासाठीच, आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करण्याची मोहीमही सुरू करण्यात आली.

 

आणखी वाचा -  पॅनसाठी आधार कार्ड का हवे? 

पॅन कार्ड आधारशी जोडताना येतायत नाकीनऊ

पॅन कार्ड-आधार कार्ड जोडणी सर्वांसाठीच बंधनकारक नाही

Web Title: Relief for non-Aadhaar card, PAN card return returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.