'आप'च्या सत्येंद्र जैन यांना ३६० दिवसांनंतर दिलासा; ४२ दिवसांसाठी बाहेर येणार; SC कडून अंतरिम जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 12:23 PM2023-05-26T12:23:18+5:302023-05-26T13:17:48+5:30

सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली होती.

relief to aap satyendar jain from supreme court interin bail | 'आप'च्या सत्येंद्र जैन यांना ३६० दिवसांनंतर दिलासा; ४२ दिवसांसाठी बाहेर येणार; SC कडून अंतरिम जामीन मंजूर

'आप'च्या सत्येंद्र जैन यांना ३६० दिवसांनंतर दिलासा; ४२ दिवसांसाठी बाहेर येणार; SC कडून अंतरिम जामीन मंजूर

googlenewsNext

आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना सुप्रीम कोर्टाने मोठी दिलासा दिला आहे. कोर्टाने जैन यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.  कोर्टाने मेडिकल अहवालाच्या आधारावर ४२ दिवसांसाठी जामीन मंजूर केला आहे, सत्येंद्र जैन यांना ईडीने ३० मे २०२२ रोजी अटक केली होती. आता जैन यांना ३६० दिवसानंतर जामीन मिळाला.

सत्येंद्र जैन गुरुवारी तिहाड जेलमधील बाथरुममध्ये चक्कर येऊन पडले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना डीडीयू रुग्णालयात शिफ्ट केलं होतं. यावेळी त्यांना ऑक्सीजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. 

Maharashtra Politics : शिंदे गट हा पक्ष नाहीच, तो तर भाजपाने पाळलेला...; संजय राऊतांचा टोला

सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले.  'जी व्यक्ती रात्रंदिवस चांगले उपचार आणि जनतेला चांगले आरोग्य देण्यासाठी झटत होती, आज त्या चांगल्या व्यक्तीला हुकूमशहाने त्रास दिला आहे. त्या हुकूमशहाचा एकच विचार असतो - प्रत्येकाला संपवायचे, तो फक्त "मी" मध्ये राहतो. त्याला फक्त स्वतःला बघायचे आहे. देव सर्व पाहत आहे, तो सर्वांना न्याय देईल. सत्येंद्रजी लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. ईश्वर त्यांना या प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे बळ देवो, असं ट्विट केजरीवाल यांनी केलं. 

सत्येंद्र जैन गेल्या १ वर्षापासून तुरुंगात आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान, जैन यांच्या वकिलांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांना आरोग्याच्या गंभीर समस्या आहेत, त्यांचे वजन ३५ किलोने कमी झाले आहे. यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.  

Web Title: relief to aap satyendar jain from supreme court interin bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.