तब्बल ९ वर्ष तपस्या करुन मुस्लीम युवकासह कुटुंबातील ३५ सदस्यांनी स्वीकारला हिंदू धर्म
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 11:36 AM2020-06-24T11:36:18+5:302020-06-24T11:41:26+5:30
नसीबने ९ वर्ष तपस्या केल्यानंतर कुटुंबासह त्याची हिंदू सनातन धर्मात घरवापसी झाली आहे
पानीपत - मुघल साम्राज्यात कट्टरपंथी बादशाह हिंदू कुटुंबाला बळजबरीनं मुस्लीम धर्म स्वीकारण्यास भाग पडत असे. अन्याय आणि अत्याचाराला घाबरून अनेकजणांनी त्यावेळी धर्मांतर केले होते, सध्या हरियाणात एक असं प्रकरण समोर आलं आहे. पानीपतच्या एका मुस्लीम युवकाने हिंदू धर्म स्वीकारला आहे. मुस्लीम युवकासह त्याच्या कुटुंबातील ३५ सदस्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे.
हिंदू युवा वाहिनीच्या मदतीनं मंदिर परिसरात मुस्लीम कुटुंबाने सनातन धर्म स्वीकारला. स्वइच्छेने आम्ही हिंदू धर्म स्वीकारल्याचं कुटुंबाचं म्हणणे आहे. पानीपतच्या आसनगावमध्ये राहणाऱ्या मुस्लीम कुटुंबाने हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर आनंद साजरा केला. कुटुंबातील प्रमुख सदस्याने हरिद्वार येथे ९ वर्षापर्यंत कठोर तपस्या केली. तपस्या केल्यानंतर आता विधिवत त्यांची हिंदू धर्मात प्रवेश केला आहे.
धर्मांतर करणाऱ्या युवकाचं नाव नसीब आहे. धर्मांतर करण्यासाठी त्यांच्यावर कोणीही दबाव टाकला नसल्याचं कुटुंबानं स्पष्टीकरण दिले आहे आसनगावच्या शिवमंदिरात आयोजित यज्ञावेळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी विधिवत हिंदू धर्माचा स्वीकार केला. यानंतर या कुटुंबाचे नामकरणही करण्यात आले. कुटुंबाने असा दावा केला आहे की, औरंगजेब काळात त्यांच्या पूर्वजांनी दबावाखाली येऊन मुस्लीम धर्मांतर केले होते.
नसीबने ९ वर्ष तपस्या केल्यानंतर कुटुंबासह त्याची हिंदू सनातन धर्मात घरवापसी झाली आहे. युवा हिंदू वाहिनीच्या जिल्हाध्यक्ष सुनील आर्यने सांगितले की, कुटुंबाने त्यांच्याकडे संपर्क केला होता, त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश करण्याबाबत विचारले त्यानंतर विधिवत पद्धतीने नसीबच्या कुटुंबाने ९ वर्ष तपस्या करुन पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे असं त्यांनी सांगितले.