मागील सरकारांकडून श्रद्धास्थाने उपेक्षित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:33 PM2022-10-22T12:33:40+5:302022-10-22T12:33:55+5:30

Narendra Modi : केदारनाथ व हेमकुंड साहिबसाठीच्या दोन रोपवे प्रकल्पांच्या पायाभरणीनंतर माना गावात एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.

Religious places neglected by previous governments, PM Narendra Modi alleges | मागील सरकारांकडून श्रद्धास्थाने उपेक्षित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

मागील सरकारांकडून श्रद्धास्थाने उपेक्षित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

Next

देहरादून: मागील सरकारांनी उपेक्षित ठेवलेल्या देशभरातील श्रद्धास्थानांना आता त्यांचे हरवलेले गतवैभव पुन्हा मिळवून देण्यात येत आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

मागील सरकारांनी श्रद्धास्थळांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोट्यवधी लोकांची व देशाच्या हजारो वर्षे जुन्या संस्कृतीची अवहेलना केली आहे. आमची श्रद्धास्थाने या केवळ वास्तू नाहीत, तर त्या आमच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक व आमचा श्वास आहेत, असेही मोदी म्हणाले. केदारनाथ व हेमकुंड साहिबसाठीच्या दोन रोपवे प्रकल्पांच्या पायाभरणीनंतर माना गावात एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.

स्थानिक उत्पादने घेण्याचे आवाहन
>> 'हिमालयातील श्रद्धास्थळांवरील विकास प्रकल्पांमुळे यात्रेकरूंसाठी केवळ मंदिरांचा प्रवास सुलभ होत नाही तर स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते,' असे ते म्हणाले.
>> तीर्थस्थळी किवा सीमावर्ती भागात जाणाऱ्या नागरिकांना त्यांनी पर्यटन बजेटच्या पाच टक्के रक्कम स्थानिक उत्पादने खरेदी करण्यावर खर्च करण्याचे आवाहन केले.

२५ वर्षांपूर्वीचा सांगितला इतिहास
२५ वर्षांपूर्वी मी माना येथे पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक ठेवली होती. कार्यकर्ते येथे जाण्यास नाखूश होते. 'मी त्यांना म्हटले की, ज्या दिवशी तुम्हाला मानाचे महत्त्व समजेल, त्या दिवशी लोक भाजपला त्यांच्या हृदयात कायमचे स्थान देतील, असे मोदी म्हणाले.
 

Web Title: Religious places neglected by previous governments, PM Narendra Modi alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.