चीनविरोधात जगभरात रोष; भारतासाठी हीच सुवर्णसंधी- नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 10:44 AM2020-07-14T10:44:25+5:302020-07-14T10:59:25+5:30
आम्ही अधिक स्पर्धात्मक, गुणवत्तेच्या बाबतीत जागरूक आणि परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो, असंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अधोरेखित केलं आहे.
नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचं जगाला संकट देणाऱ्या चीनसोबत व्यवहार करण्यासाठी जगभरातील अनुत्सुक आहेत. त्यामुळे भारतीय उद्योगांसाठी ही एक मोठी संधी आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. न्यू इंडियामधील स्वावलंबी भारत या विषयावर वेबिनारला संबोधित करताना गडकरी बोलत होते. ते म्हणाले, जागतिक आर्थिक परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे, जग चीनशी व्यवहार करण्यास उत्सुक नाही. त्यामुळे भारतीय उद्योगांसाठी ही एक उत्तम संधी आहे. हा एक आहे एक छुपा आशीर्वाद आहे. आम्ही अधिक स्पर्धात्मक, गुणवत्तेच्या बाबतीत जागरूक आणि परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो, असंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अधोरेखित केलं आहे.
मंत्री म्हणाले की, सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी), कृषी विकासदर आणि ग्रामीण उद्योग विकास वाढविणे हे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. “ईझ ऑफ डुइंग बिझिनेसमध्ये वर्ल्ड बँकेने निश्चितच आमची रँक वाढविली आहे, परंतु क्लियरन्स, प्रमाणपत्र आणि अनुपालन प्रक्रिया खूप जटील आहेत. आम्ही सर्व सिस्टम डिजिटल बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. "जीडीपी, कृषी विकासदर आणि ग्रामीण उद्योग विकास वाढविणे हे आमचे उद्दिष्ट आहे," असेही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरांनी सांगितलं आहेत.
पुढील पाच वर्षांत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)चे उत्पन्न १ लाख कोटी रुपयांवर नेण्याची योजना आहे. एनएचएआयमध्ये सध्या आपण दरवर्षी 28,000 कोटी रुपये कमवतो आणि येत्या पाच वर्षांत १ लाख कोटी रुपये घेण्याची माझी योजना आहे. मी सरकारच्या बजेटवर पूर्णपणे अवलंबून नसल्याचंही गडकरींनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा
लेहपासून 250 किमी अंतरावर चीनकडून भूमिगत 24 क्षेपणास्त्रे तैनात; भारताची चिंता वाढवणारा खुलासा
चीनमध्ये नव्या संकटानं पसरली भीती; 3.8 कोटी लोक प्रभावित, 140 जणांचा मृत्यू
अंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी
बँक अन् पोस्टाला मिळाली जबरदस्त सुविधा; मोठी रक्कम काढल्यास मोजावे लागणार जास्त पैसे
धक्कादायक! प. बंगालमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला भाजपा आमदाराचा मृतदेह
हो, मी पुढाकार घेईन; मोदी सरकारला 'टक्कर' देण्यासाठी पवारांचा पॉवरफुल प्लॅन