राम मंदिर प्रत्यक्ष साकारण्यामागील पाच लाेकांचे उल्लेखनीय याेगदान; कोण आहेत ते?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 11:33 AM2024-01-21T11:33:51+5:302024-01-21T11:40:31+5:30

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर निर्माणाचे कार्य आणखी वेगाने सुरू हाेईल

Remarkable contribution of five people behind actual realization of Ram Mandir | राम मंदिर प्रत्यक्ष साकारण्यामागील पाच लाेकांचे उल्लेखनीय याेगदान; कोण आहेत ते?, पाहा

राम मंदिर प्रत्यक्ष साकारण्यामागील पाच लाेकांचे उल्लेखनीय याेगदान; कोण आहेत ते?, पाहा

राम मंदिरात श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयाेध्या नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर निर्माणाचे कार्य आणखी वेगाने सुरू हाेईल. सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर राम मंदिर ट्रस्ट स्थापन करण्यात आले. तेव्हापासून आताच्या प्राणप्रतिष्ठा साेहळ्यापर्यंत अनेक लाेकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यामध्ये पुढील पाच लाेकांचे याेगदान उल्लेखनीय राहिले. त्यांच्याबाबत जाणून घेऊ या...

महंत नृत्य गाेपाल दास
नृत्य गाेपाल दास हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. अनेक दशकांपासून ते राम मंदिर आंदाेलनाच्या संरक्षकाच्या भूमिकेत राहिले आहेत. नृत्य  यांचा जन्म ११ जून १९३८ राेजी मथुरा येथे झाला. वयाच्या १२व्या वर्षीच त्यांनी संन्यास घेतला आणि अयाेध्येत दाखल झाले. मंदिर निर्माणासाठी देणगी गाेळा करण्यापासून अनेक कामे त्यांच्याच नेतृत्वात हाेतात. 

नृपेंद्र मिश्रा
नृ पेंद्र मिश्रा हे राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे मंदिर निर्माण कार्याची अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे. ते १९६७च्या तुकडीचे माजी सनदी अधिकारी असून, २०१४ मध्ये ते पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे प्रधान सचिव हाेते. मंदिर ठरलेल्या कालमर्यादेत विनाअडथळा पूर्ण भव्यतेने तयार व्हावे, यासाठीच मिश्रा यांना अध्यक्ष बनविण्यात आले आहे.

के. पराशरण 
स र्वाेच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील के. पराशरण हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य आहेत. ९२ वर्षांचे वय असूनही ते अनेक तास सर्वाेच्च न्यायालयात हिंदू पक्षाच्या बाजूने युक्तिवाद करत. मंदिराच्या बाजूने निर्णय लागण्यामागे त्यांचे फार माेलाचे याेगदान हाेते. त्यांना ‘श्रीरामाचे हनुमान’ असेही म्हटले गेले. पराशरण यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्काराने गाैरविण्यात आलेले आहे.

चंपत राय
विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय हे प्रदीर्घ कालावधीपासून राम मंदिर आंदाेलनाशी जुळलेले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे ते  सरचिटणीस आहेत. ट्रस्टची बैठक असाे किंवा राम मंदिराशी संबंधित एखादा मुद्दा, चंपत राय हेच प्रत्येक गाेष्ट अधिकृत करतात. आंदाेलनाला राष्ट्रव्यापी जनआंदाेलन बनविण्यात राय यांची भूमिका महत्त्वाची राहिली. 

गाेविंददेव गिरी महाराज
स्वामी गाेविंददेव गिरी महाराज हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे काेषाध्यक्ष आहेत. मंदिर निर्माणासाठी गाेळा करण्यात आलेल्या देणगीचा संपूर्ण हिशेब त्यांच्याकडे आहे. देवगिरी महाराज यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात वर्ष १९४९ मध्ये झाला. त्यांनी वयाच्या १७व्या वर्षापासून प्रवचन करणे सुरू केले हाेते. अनेक पाैराणिक ग्रंथांवर ते देशविदेशात प्रवचन करतात. 

Web Title: Remarkable contribution of five people behind actual realization of Ram Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.