Remdesivir: दररोजच्या १० हजार लसींवरून ३.२५ लाखांपर्यंत वाढले उत्पादन, भारताने अशी दूर केली रेमडेसिविरची टंचाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 06:26 PM2021-05-12T18:26:59+5:302021-05-12T18:29:48+5:30

Coronavirus in India : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. त्यानंतर कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी टंचाई निर्माण झाली होती.

Remdesivir: Production increased from 10,000 vaccines per day to 3.25 lakh, India solved shortage of remdesivir | Remdesivir: दररोजच्या १० हजार लसींवरून ३.२५ लाखांपर्यंत वाढले उत्पादन, भारताने अशी दूर केली रेमडेसिविरची टंचाई 

Remdesivir: दररोजच्या १० हजार लसींवरून ३.२५ लाखांपर्यंत वाढले उत्पादन, भारताने अशी दूर केली रेमडेसिविरची टंचाई 

Next
ठळक मुद्देरेमडेसिविरची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने रेमडेसिविरचे उत्पादन पूर्ण क्षमतेने करण्याचे दिले आदेशमात्र १० एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने रेमडेसिविरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढले१० एप्रिल रोजी देशात रेमडेसिविरच्या निर्मितीचे १० प्लँट होते. मात्र १५ एप्रिलपर्यंत त्याची संख्या वाढून ५८ वर पोहोचली

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्याच्या अखेरीपासून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. त्यानंतर कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी टंचाई निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना तासनतास उभे राहूनही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हते. तसेच टंचाई निर्माण झाल्याने रेमडेसिविरच्या काळ्याबाजारालाही सुरुवात झाली होती. रेमडेसिविरच्या टंचाईवरून केंद्र सरकारवर जोरदार टीकाही झाली. त्यानंतर रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले होते. अखेरीस आता देशातील रेमडेसिविरचे दैनंदिन उत्पादन १० हजार लसींवरून ३.२५ लाख लसींपर्यंत पोहोचले आहे. (Production increased from 10,000 vaccines per day to 3.25 lakh, India solved shortage of remdesivir)

सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि वाढीव लसी गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले गेले. रेमडेसिविरची मागणी वाढल्यानंतर सरकारने २ एप्रिलला एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीमध्ये खासगी कंपन्यांनी रेमडेसिविरच्या उत्पादनाची आपल्याकडे पुरेसी क्षमता असल्याचे सांगितले. मात्र या औषधाला फार मागणी नसल्याने त्याचे उत्पादन कमी ठेवण्याची माहिती दिली.  

औषध कंपन्यांनी सांगितले की, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये रेमडेसिविरची उत्पादन क्षमता ३६ लाख एवढी होती. मात्र कंपन्या मागणीसुनार केवळ ५ ते ६ लाख लसींचेच उत्पादन करत होते. मात्र रेमडेसिविरची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने रेमडेसिविरचे उत्पादन पूर्ण क्षमतेने करण्याचे आदेश दिले.  

मात्र १० एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने रेमडेसिविरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढले. त्यातून साठेबाजी आणि काळ्या बाजाराला सुरुवात झाली. त्यामुळे विविध राज्य सरकारांनी राज्यात उत्पादित होणाऱ्या रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी घातली. रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्याचे आव्हान सरकारसमोर होते. सरकारी सूत्रांनी सांगितले की, आम्ही याचा विचार केला की, ज्या कंपनीकडे आवश्यक कच्चा माल आणि डब्ल्यूएचओकडून मिळालेली औषध निर्मितीची परवानगी दिली पाहिजे. केंद्राने २४ तासांत तशी परवानगी दिली. १० एप्रिल रोजी देशात रेमडेसिविरच्या निर्मितीचे १० प्लँट होते. मात्र १५ एप्रिलपर्यंत त्याची संख्या वाढून ५८ वर पोहोचली. 

Web Title: Remdesivir: Production increased from 10,000 vaccines per day to 3.25 lakh, India solved shortage of remdesivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.