Micromax आठवतेय का? चिनी कंपन्यांचा बदला घेणार; नवे स्मार्टफोन आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 08:51 AM2020-08-18T08:51:43+5:302020-08-18T08:53:13+5:30
भारतीय ग्राहक आता चिनी कंपन्यांचे मोबाईल सोडून अन्य पर्याय शोधू लागला आहे. सध्यातरी सॅमसंग एकच परवडणारा पर्याय असून नोकियाही बस्तान बसविण्यासाठी धडपडत आहे.
Micromax ही अशी भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी होती जी 7-8 वर्षांपूर्वी भारतीय बाजारावर राज्य करत होती. मात्र, जेव्हा चिनी कंपन्य़ांनी भारतीय़ बाजाराचे दरवाजे ठोठावायला सुरुवात केली तेव्हा ही कंपनी बाजारातूनच गायब झाली. भारतीय ग्राहकांनी मायक्रोमॅक्सकडे पाठ फिरविली. गलवान घाटीतील तणावामुळे आता चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. यामुळे मायक्रोमॅक्सनेही चिनी कंपन्यांचा बदला घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी पुन्हा भारतीय बाजारात येत आहे.
भारतीय ग्राहक आता चिनी कंपन्यांचे मोबाईल सोडून अन्य पर्याय शोधू लागला आहे. सध्यातरी सॅमसंग एकच परवडणारा पर्याय असून नोकियाही बस्तान बसविण्यासाठी धडपडत आहे. अशातच भारतीय म्हणून मायक्रोमॅक्सला पुन्हा सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. मायक्रोमॅक्सने पुनरागमन करण्याचे संकेत ट्विट करून दिले आहेत.
मायक्रोमॅक्सने 74 व्या स्वातंत्र्य दिनी एक व्हिडीओ सोबत पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये कंपनीने म्हटले आहे की, आम्ही लवकरच भारतीय बाजारात नवे स्मार्टफोन लाँच करत आहोत. कंपनीचे सह संस्थापक राहुल शर्मा यांनीही त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, चला नवीन सुरुवात करुया!. यामुळे पुढील काही महिन्यांत भारतीय बाजारात मायक्रोमॅक्सचे नवे स्मार्टफोन पहायला मिळणार आहेत.
This independence day, I urge every Indian to strive to be AtmaNirbhar. एक नई शुरुआत करें? #IndependenceDay#स्वतंत्रतादिवसhttps://t.co/DwEE2uw7Y7
— Rahul Sharma (@rahulsharma) August 15, 2020
मात्र, मायक्रोमॅक्सने सध्यातरी नवीन स्मार्टफोन कोणते अणि कसे असतील याबाबत काहीच माहिती दिलेली नाहीय. काही दिवसांपूर्वी कंपनी एकाचवेळी 3 फोन लाँच करणार असल्याचे समजले होते. हे तिन्ही फोन कमी बजेटमधील असतील आणि दमदार फिचर्स देण्यात येतील. मायक्रोमॅक्सला केंद्र सरकारच्या PLI योजनेचाही फायदा मिळणार आहे. य़ा योजनेतून मोदी सरकार भारतात मोबाईल बनविणाऱ्या कंपन्यांना 4-6 टक्के प्रोत्साहन निधी देणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
SBI ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर दंड भरा
महत्वाचे! गृहकर्जाच्या EMIवर बँका मोठी सूट देण्याच्या तयारीत; करत आहेत प्लॅनिंग
मुकेश अंबानी चार छोट्या कंपन्या खरेदी करणार; रिलायन्सकडून जोरदार प्रयत्न
Old Is Gold: खबरदार, जुने सोने विकायला जाल तर! जीएसटी भरावा लागण्याची शक्यता
BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग
सावधान! Work From Home चा मोठा फटका बसणार; Income Tax भरताना नाकीनऊ येणार