इंदिराजींच्या पुण्यतिथीचा मोदी सरकारला विसर
By admin | Published: October 31, 2014 01:15 AM2014-10-31T01:15:36+5:302014-10-31T01:15:36+5:30
मोदी सरकारने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे हौतात्म्य पूर्णपणो दुर्लक्षित करून सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेऊन नव्या वादाला जन्म दिला आहे.
Next
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे हौतात्म्य पूर्णपणो दुर्लक्षित करून सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेऊन नव्या वादाला जन्म दिला आहे.
आतार्पयत 19 नोव्हेंबर हा इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस सारा देश राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करीत आलेला आहे. परंतु मोदी सरकारच्या या नव्या निर्णयाने देशाच्या ऐतिहासिक परंपरा मोडित काढून नवी परंपरा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आश्चर्य म्हणजे मोदी सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसने पूर्णत: मौन पाळले आहे. काँग्रेसचा कोणताही ज्येष्ठ नेता यावर भाष्य करायला तयार नाही. पक्षाच्या प्रवक्तापदावरून हटविण्यात आलेले खासदार शशी थरूर यांनी या वादावर सर्वात प्रथन प्रतिक्रिया दिली. केवळ महात्मा गांधी यांची जयंती आणि पुण्यतिथीशी संबंधित कार्यक्रमांमध्येच सरकारची भूमिका असणार, हे ठरले असताना आता त्याकडे दुर्लक्ष का बरे केले आहे, असा सवाल त्यांनी केला.
4काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन म्हणाले, ‘महात्मा गांधी जयंती व पुण्यतिथी वगळता अन्य सर्व कार्यक्रम राजकीय पक्ष, ट्रस्ट व समित्यांवर सोपविण्यात आले पाहिजे, अशी सूचना सोनिया गांधी यांनी दोन वर्षापूर्वी केली होती. त्यामुळे सरकार इंदिराजींची पुण्यतिथी पाळत नसल्याबद्दल काँग्रेसला खंत नाही.
4इंदिराजींचे बलिदान व त्यांच्या कार्याकडे कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही. पटेल आणि इंदिरा गांधी यांचे आपापल्या क्षेत्रत मोठे योगदान आहे. ते देश कधीही विसरू शकत नाही.
पटेल जयंतीनिमित्त आज ‘एकता दौड’
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
रस्ते धुवून-पुसून चकचकीत करण्यात आले आहेत. नवी दिल्लीच्या लुटियन झोन येथील पंतप्रधान कार्यालय व राष्ट्रपती भवनपासून तर आसपासच्या परिसरात असलेली सर्व शासकीय, बिगर शासकीय कार्यालये गुरुवारी दुपारी 2 वाजेपासूनच बंद केली आहेत. 31 ऑक्टोबर रोजी या भागात देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीप्रीत्यर्थ ‘एकता दौड’ (रन फॉर युनिटी) चे आयोजन केवळ दिल्लीतच नव्हे तर देशभरातील सर्व प्रदेश व जिल्हा मुख्यालये आणि मोठय़ा शहरांत करण्यात आले आहे.
यंदापासून पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. सकाळी 7 वाजता विजय चौक येथे पंतप्रधान हिरवी ङोंडी दाखवून या दौडचा शुभारंभ करतील व इंडिया गेटपासून तर पटेल चौकार्पयत स्वत: दौडमध्ये सामील होतील.
त्यांच्यासोबत काही केंद्रीय मंत्री आणि अधिकारीही सहभागी होणार आहेत. या एकता दौडमध्ये सामील होणा:यांना देशाचे ऐक्य, अखंडता आणि सुरक्षा कायम राखण्याची शपथ दिली जाईल.
सुरक्षा कारणांवरून गणराज्य दिनाच्या सुरक्षेप्रमाणोच आसपासची सर्व शासकीय कार्यालये गुरुवारी दुपारी 2 पासून तर शुक्रवारी सकाळी 9.3क् र्पयत बंद ठेवण्यात आली आहेत. हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. आज शुक्रवारी पहाटे 5 वाजेपासून ही दौड प्रारंभ होईल आणि 9.3क् वाजता तिची सांगता केली जाईल. देशातील 11क्क् ठिकाणी या एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे आज सकाळी 8.15 वाजता राष्ट्रपती भवन येथे या दौडचा शुभारंभ करतील.
मोदी ‘शक्तिस्थळी’ जाणार नाही
आज शुक्रवारी इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. आज इंदिराजींचे समाधीस्थळ असलेल्या ‘शक्तिस्थळ’ येथे कोणताही शासकीय कार्यक्रम होणार नाही, हे आज स्पष्ट झाले. आजवर राष्ट्रपती आणि पंतप्रधान शक्तिस्थळी जाऊन इंदिराजींना श्रद्धांजली अर्पण करीत असत. परंतु यावेळी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शक्तिस्थळी जाणार नसल्याचे समजते. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या मात्र आपल्या कुटुंबीयांसमवेत तेथे जाऊन इंदिराजींना श्रद्धांजली अर्पण करतील.