तामिळनाडूत सापडले प्राचीन संस्कृतीचे अवशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 05:19 AM2018-06-29T05:19:17+5:302018-06-29T05:19:21+5:30

तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील वैगेई नदीच्या तीरावरील किळादी या लहानशा गावात करण्यात आलेल्या उत्खननात ख्रिस्तपूर्व २०० वर्षांच्या कालावधीतील म्हणजे २२०० वर्षांपूर्वीच्या प्रगत संस्कृतीचे अवशेष आढळले

Remnants of ancient cultures found in Tamilnadu | तामिळनाडूत सापडले प्राचीन संस्कृतीचे अवशेष

तामिळनाडूत सापडले प्राचीन संस्कृतीचे अवशेष

Next

मदुराई : तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील वैगेई नदीच्या तीरावरील किळादी या लहानशा गावात करण्यात आलेल्या उत्खननात ख्रिस्तपूर्व
२०० वर्षांच्या कालावधीतील म्हणजे २२०० वर्षांपूर्वीच्या प्रगत संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत. आर्किआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया (एएसआय)ने केलेल्या उत्खननातून प्राचीन तामिळनाडूमध्ये संगम काळामध्ये वैगई नदीच्या तीरावर ही समृद्ध संस्कृती नांदत होती, असे स्पष्ट झाले आहे.
मोहंजोदारो, हरप्पा या संस्कृतींचा शोध लागल्यानंतर आर्यांचीच
संस्कृती श्रेष्ठ असल्याचे सांगण्यात
येत होते. मात्र प्राचीन भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात द्रविड संस्कृतीचे अवशेष सापडल्याने आर्य येण्याआधीही येथील
लोकांची संस्कृती अतिशय समृद्ध होती, हे यामुळे सिद्ध झाले आहे.
तामिळनाडूतील तेन्नी, दिंडिगल, शिवगंगा, रामनाथपूरम, मदुराई या पाच जिल्ह्यांतून वाहणाऱ्या वैगई नदीच्या खोºयात जुन्या संस्कृतीच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी एएसआयने २९३ जागी उत्खनन सुरू केले होते. ते २0१३ च्या सुमारात सुरू झाले.
किळादीमध्ये उत्खननाच्या पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी
२0१७ मध्ये ख्रिस्तपूर्व २०० वर्षे कालावधीतील नागरी वस्तीचे
अवशेष सापडले. तामिळनाडूमध्ये संगम काळापासून नागरी संस्कृती अस्तित्वात होती, याचा हा आजवर सापडलेला सर्वात मोठा व सबळ पुरावा आहे.
किळादी येथे विटांनी बांधलेल्या घरांचे अवशेष व १३ पायºया
असलेली विहीरही सापडली. मातीच्या भांड्यांची ७२ खापरे मिळाली आहेत. त्यावर तामिळ
लिपीत मजकूर लिहिलेला आहे.
त्यात इयानन, उदिरन, वेंदन, संतनावती, सतान अशी काही तामिळ नावे लिहिलेली आढळून आली. किळादी येथे आता वस्तुसंग्रहालय स्थापन होण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मात्र हा निर्णय
केंद्र सरकारच्या अख्यतारीत आहे, असे एएसआयच्या चेन्नई विभागाचे अधीक्षक ए. एम. व्ही. सुब्रमणयम यांनी सांगितले. किळादीप्रमाणेच श्रीलंकेमध्येही अशा संस्कृतीचे अवशेष उत्खननात मिळाले आहेत.


किळादीतील उत्खननाच्या तिसºया टप्प्यासाठी केंद्र सरकारने ४० लाख रुपयेही मंजूर केले होते. मात्र अचानक हे उत्खनन करणारे एएसआयचे अधिकारी के. अमरनाथ रामकृष्ण यांची गुवाहाटी येथे बदली केली.
मग उत्खनन सुरू ठेवण्यासाठी मंजुरी मिळण्यास विलंब होऊ लागला. त्यास तामिळनाडूतील राजकीय पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला. द्रविडी संस्कृतीचे महान स्वरूप सर्वांसमोर येऊ नये म्हणून केंद्र सरकार उत्खननात अडथळे आणत असल्याचा आरोपही करण्यात आला.

Web Title: Remnants of ancient cultures found in Tamilnadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.